Join us  

मयांक अगरवालला लवकरच मिळणार गूड न्यूज

द्विशतकानंतर मयांकला आता गूड न्यूज मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 4:15 PM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवालने द्विशतक झळकावत सर्वांचीच मनं जिंकली. मयांकच्या द्विशतकाच्या जोरावर भारताला बांगलादेशवर सहज विजय मिळवता आला. या द्विशतकानंतर मयांकला आता गूड न्यूज मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

बांगलादेशिरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तर मयांकने द्विशतकासह दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला होता. आता त्याला ताही दिवसांतच गूड न्यूज मिळणार असल्याचे कळत आहे. भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मयांकने फक्त द्विशतक झळकावले नाही, तर त्याची खेळी चांगलीच आक्रमकही होती. द्विशतक झळकावताना मयांकने षटकार लगावला होता. त्यावेळी काही जणांना वीरेंद्र सेहवागचीही आठवण आली. त्यामुळे आता सेहसागसारखीच भूमिका मयांकला मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेत रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार रोहित गेले वर्षभर सातत्यानं खेळत आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील 16 सामन्यांसह 60 हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यालाही विश्रांतीची गरज आहे.  त्यामुळे रोहितला विश्रांती दिल्यावर मयांकची एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-20 संघात वर्णी लागू शकते, असे म्हटले जात आहे.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक

  • ट्वेंटी-20 मालिका

6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबाद

  • वन डे मालिका

15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :मयांक अग्रवालभारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मा