Join us  

लागली पैज; असा अफलातून झेल कधी पाहिला नसाल, Video

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अॅरोन फिंचने 188 धावांची फटकेबाजी करताना धुमाकूळ घातला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:04 AM

Open in App

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अॅरोन फिंचने 188 धावांची फटकेबाजी करताना धुमाकूळ घातला होता. बुधवारी या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारी घटना घडली. एनएसडब्लू ब्लू आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात जॅक एडवर्डने घेतलेला झेप पाहून सर्वच अवाक् झाले. 

प्रथम फलंदाजी करताना ब्लू संघाने 50 षटकांत 6 बाद 348 धावा केल्या. डॅनियल ह्युजेसने 143 चेंडूंत 13 चौकार व 4 षटकार खेचून 152 धावांची खेळी केली. त्याला मोइजेस हेन्रीकने 58 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा आणि मॅथ्यू गिल्केसने 51 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकार खेचून 82 धावा करताना दमदार साथ दिली. 

प्रत्युत्तरात जॉश फिलिपने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला साजेशी सुरुवात करून दिली. पण, हॅरी कोनवेनं दोन्ही सलामीवीरांना मागे टाकत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकले. फिलिप 50 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 64 धावा करून माघारी परतला. मिचेल मार्श संघाला सावरेल असं वाटत होते, परंतु कोनवेनं त्यालाही माघारी पाठवले. गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूवर तो भोपळा न फोडताच माघारी परतला. जॅक एडवर्डने अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले. एडवर्डचा हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आॅस्ट्रेलिया