Join us

Malinga Retires: अखेरच्या सामन्यात मलिंगाने भारताच्या 'या' दिग्गज गोलंदाजाचा मोडला विक्रम

आपल्या कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय शेवटच्या वन डे सामन्यात 3 गडी बाद करत अनिल कुंबळेला मागे टाकत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:43 IST

Open in App

मुंबई:श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आपल्या कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय शेवटच्या वन डे सामन्यात 3 गडी बाद करत अनिल कुंबळेला मागे टाकत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.   आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत मलिंगाने नववे स्थान पटकाविले आहे. त्याने 226 सामन्यात 338 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंकेसाठी वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन असून त्याने 523 विकेट्स घेतल्या आहेत. तर दूसऱ्या स्थानावर वसीम अक्रम (502), श्रीलंकेचा चामिंडा वास (399), शाहिद अफ्रिदी(395), शॅान पोलॅाक(393), ग्लेन मॅक्ग्राथ  (381), ब्रेट ली(380), अनिल कुंबळे(337) विकेट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :लसिथ मलिंगाश्रीलंकाअनिल कुंबळे