नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा इटलीमध्ये संपन्न झालेला विवाह सोहळा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या सोहळ्याची व्यवस्था, विधी, नवदाम्पत्याची वेशभूषा यांचे मीडिया आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. सुव्यवस्थित आणि थाटात पार पडलेल्या सोहऴ्यामुळे विराट कोहली आणि अनुष्कासाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला होता. दरम्यान, आता या संपूर्ण विवाह सोहळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांचे विराट कोहलीने कौतुक केले आहे. विराटने या विवाह सोहळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या वेडिंग प्लॅनरसोबतचे छायाचित्र ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. आमच्या जीवनातील सर्वात सुंदर अशा क्षणांना या चार जणांनी अविस्मरणीय बनवले, असे विराटने या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये विराटने शादी स्क्वॉयड नामक कंपनीचा उल्लेख केला आहे. ही मुंबई स्थित विवाह व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. टीना थारवानी, सौरभ मल्होत्रा आणि मनोज मित्रा हे या कंपनीचे संस्थापक आहेत. याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा माजी प्रियकर बंटी याने या विवाहात महत्त्वाचे योगदान दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. बंटी हा विराट कोहलीसोबत त्याचा ब्रँड मॅनेजर म्हणून काम पाहतो. त्यानेच गेल्या वर्षी विराट कोहलीला प्युमाचा 100 कोटींचा करार मिळवून दिला होता. बंटीनंतर डेस्टिनेशन वेडिंग प्लानर देविका नारायण हिने या विवाहात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विराटने जो फोटो शेअर केला आहे. त्यात देविका दिसत आहे. मुळची लखनौ येथील असलेली देविका ही मुख्यत्वेकरून डेस्टिनेशन वेडिंग प्लान करते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विवाह सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी विराटने त्या चार जणांचे मानले आभार
विवाह सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी विराटने त्या चार जणांचे मानले आभार
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा इटलीमध्ये संपन्न झालेला विवाह सोहळा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या सोहळ्याची व्यवस्था, विधी, नवदाम्पत्याची वेशभूषा यांचे मीडिया आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:15 IST