टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवन याला त्याची माजी ऑस्ट्रेलियन पत्नी आएशा मुखर्जीविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात मोठा कायदेशीर दिलासा मिळाला. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने ५.७२ कोटी रुपये शिखरला परत करावेत, असे आदेश मुखर्जीला दिले आहेत. हे जोडपे २०२३ साली मानसिक छळाच्या कारणाने विभक्त झाले होते.
२१ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील खासगी समारंभात शिखरने मैत्रीण सोफी शाईन हिच्याशी विवाह केला. २५ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयाने मुखर्जीविरुद्ध आदेश दिले. मुखर्जी हिने मालमत्तेच्या सेटलमेंटसाठी ऑस्ट्रेलियातील न्यायालयात अर्ज केला होता. कायद्यानुसार वैवाहिक मालमत्ता पती-पत्नीमध्ये विभागली जाण्याची तरतूद असली, तरी धवनला मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कौटुंबिक न्यायालयात या निर्णयाला आव्हान देत, तो टिकाऊ नसल्याचे नमूद केले आणि परिणामी मुखर्जी हिला ती रक्कम धवनला परत करण्याचे निर्देश दिले. विवाह विशिष्ट भारतात हिंदू अधिनियमांतर्गत अशा मालमत्ता किंवा निधी हस्तांतरणाची थेट तरतूद नाही. त्यामुळे दिल्ली न्यायालयाने हा निर्णय 'अस्थिर' ठरवत, मुखर्जी हिला रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सोफी शाइनसोबतच्या विवाहानंतर काही चाहत्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांवरही धवनने प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका द्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 'माझी पहिली पत्नी मला सोडून गेल्यावर तिने सांगितले की, कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करणार नाही, पण पुन्हा लग्न करून मी तिला योग्य उत्तर दिले.'
'माझ्या लग्नाबद्दल मला शुभेच्छा देणार नाहीस का?' हे द्विट व्हायरल होताच धवनने ते 'असंवेदनशील आणि खोटे' असल्याचे स्पष्ट केले. शांतपणे प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, 'मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. सकारात्मक शक्तीवर माझा ठाम विश्वास आहे. भूतकाळाचा मी आदर करतो. कृपया माझे नाव असंवेदनशील आणि खोट्या विधानांशी जोडू नका. धन्यवादा'