Join us  

'मुख्य प्रशिक्षकांना वादग्रस्त पद्धतीने वगळले नाही'

भारतीय क्रिकेट संघातील सिनियर खेळाडू प्रशिक्षकांचे भविष्य प्रभावित करीत असल्याचे वृत्त प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी फेटाळून लावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:39 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील सिनियर खेळाडू प्रशिक्षकांचे भविष्य प्रभावित करीत असल्याचे वृत्त प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले,‘यात काहीच नवे नाही.’भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी काही सिनियर खेळाडूंसोबत कथित वादामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला. या सिनियर खेळाडूंनी त्यांच्या सरावाच्या शैलीला विरोध केला होता. त्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचा समावेश होता. सीओएच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंच्या विरोधामुळे प्रशिक्षकांना पद सोडावे लागले. गेल्या वर्षी पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधार कोहलीसोबतच्या मतभेदानंतर पदाचा राजीनामा दिला होता. सीओएच्या बैठकीनंतर राय म्हणाले, ‘हे सौरव गांगुली व ग्रेग चॅपेल यांच्यापासून होत आहे. त्यात काही नवे नाही.’कुंबळे व अरोठे या दोघांनी आपली भूमिका चोख बजावली, पण संघावर प्रभाव असलेल्या काही खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ते मान्य नव्हते. भारताचे माजी आॅफ स्पिनर रमेश पोवार यांना अंतरिम प्रशिक्षक बनविण्यात आले असून महिला संघासाठी लवकरच एका स्थानिक प्रशिक्षकाची नियुक्ती होेईल.बीसीसीआयचे अधिकारी आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यादरम्यान २२ जुलै रोजी कोलकातामध्ये बैठक होणार आहे. त्यात क्रिकेटपटूंया डोपिंग चाचणीबाबत चर्चा होणार आहे. बीसीसीआयने राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या अंतर्गत येण्यास अद्याप दुजोरा दिलेला नाही.बीसीसीआय आपल्या खेळाडूंची चाचणी खासगी एजन्सीमार्फत करते. दरम्यान, विश्व डोपिंग विरोधी एजन्सीसोबत बैठकीनंतर आयसीसीवर दबाव निर्माण होईल. त्यानंतर आयसीसीवर बीसीसीआयला नाडानुसार काम करण्याचे निर्देश द्यावे लागतील.बैठकीमध्ये उपस्थित होणाºया अन्य विषयांमध्ये राज्य लीग स्पर्धेचा राहील. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये बाहेरच्या स्थानिक खेळाडूंचा सहभाग हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच टीएनपीएलला या बाहेरच्या १६ खेळाडूंविना आयोजनाची परवानगी दिली होती.बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले,‘आम्ही विविध राज्य लीगमध्ये बाहेरच्या खेळाडूंना त्यांच्या आयपीएल अनुभवाच्या आधारावर परवानगी देण्याबाबत विचार करू. ते आयपीएलमध्ये नियमित नाहीत तर त्यांच्या या स्पर्धेत खेळण्याबाबत विचार करता येईल, पण आयपीएलमध्ये नियमित खेळत असाल तर या स्पर्धेत खेळता येणार नाही. तसे एक खेळाडू जास्तीत जास्त दोन लीगमध्ये खेळू शकतो.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ