Join us

माही रिटर्न! सोशल मीडियावर हवा धोनीची

साेशल ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 01:47 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला. मात्र, अजूनही त्याची क्रेझ काही कमी होत नाही. आयपीएलच्या आगामी १४व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली, ती फक्त महेंद्रसिंग धोनीला पुन्हा खेळताना पाहायला मिळणार या कारणामुळेच. त्यातच आता धोनीनेही आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली असल्याने सोशल मीडियावरही ‘माही रिटर्न’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. धोनी सध्या चेन्नईत आहे. कोरोना चाचणीनंतर आणि क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर धोनीने बंदिस्त स्टेडियममध्ये सरावास सुरुवात केली. सराव सत्रादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल