Join us  

महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती भारतीय संघासाठी नुकसानकारक, 'देवां'चे भाकित....

आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 3:40 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला भारतीय संघात यष्टीरक्षणाबाबत प्रयोग सुरु झाले आहेत. रिषभ पंतला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याची जबाबदारी आता कामचलाऊ यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे सोपवण्यात आला आहे. पण आता पंत संघात नसला तरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा चांगलीच रंगत आहे. पण धोनीने जर निवृत्ती घेतली तर त्याचे भारतीय संघाला नुकसान होईल, असे भाकित चक्क देवांनी केले आहे.

महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला.

आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिले होते. पण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर धोनी हा आपल्याला भारतीय संघातही दिसू शकतो, असेही शास्त्री यांनी सांगितले होते.

भारताचे माजी विश्वविेते कर्णधार कपिल देव यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. देव म्हणाले की, " धोनी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा भारतीय संघाचे मोठे नुकसान होईल. कारण बरेच वर्षे त्याने देशाची सेवा केली आहे. पण खेळाडूला एक दिवस निवृत्ती घ्यावीच लागले. धोनीला निवृत्ती घ्यावीच लागेल."

कपिल पुढे म्हणाले की, " धोनी सध्याच्या घडीला सामने खेळत नाही. पण एक दिवस त्याला लोकांसमोर यावे लागेल आणि आपण कधीपर्यंत देशाची सेवा करणार आहोत, हे सांगावे लागेल. पण धोनीच्या निवृत्तीने संघाचे नुकसान होईल, हे मात्र नक्की."

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकपिल देव