Join us

महेंद्रसिंग धोनी सीएसकेचे कर्णधारपद सोडणार?

IPL 2020: धोनीच्या या मतानंतर पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद धोनी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच्याजागी फाफ डूप्लेसिसचे नाव पुढे येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:30 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. अखेरच्या सामन्यानंतर धोनीने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी संघात बदलाचे संकेत दिले होते आणि त्याचवेळी त्याने युवा खेळाडूंकडे जबाबदारी सोपवण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

धोनीच्या या मतानंतर पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद धोनी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच्याजागी फाफ डूप्लेसिसचे नाव पुढे येत आहे. सीएसकेला यंदा आयपीएलमध्ये १४पैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि १२ गुणांसह त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनीही धोनी पुढील वर्षी सीएसकेचे नेतृत्व सोडून ते फाफ डू प्लेसिसकडे सोपवले, असे मत व्यक्त केले. ''जिथपर्यंत मला माहित आहे, २०११ नंतर धोनी कर्णधारपदावर कायम राहायचे की नाही, याचा विचार करत होता, परंतु भारतासमोर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे दोन आव्हानात्मक दौरे होते आणि तेव्हा कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय नव्हता. त्यामुळे तो कर्णधारपदावर कायम राहिला आणि योग्य वेळ आल्यावर त्यानं नेतृत्वाची माळ विराट कोहलीकडे सोपवली,’  असे बांगर यांनी क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात सांगितले.

टॅग्स :आयपीएलIPL 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी