IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

एमएस धोनीच्या या पोस्टमुळे विविध चर्चांना उधाणा आले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 18:44 IST2024-03-04T18:29:57+5:302024-03-04T18:44:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mahendra Singh Dhoni shared a post on Facebook and added to the suspense among the fans. | IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये धोनीने संकेत दिले आहेत की, तो आता इंडियन प्रीमियर लीग (IPL)२०२४मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो. त्याच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

धोनीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'नव्या सीझन आणि नवीन 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही'. या पोस्टमध्ये धोनीने त्याची नवीन भूमिका कोणती असेल याचा खुलासा केलेला नाही. मात्र धोनीच्या या पोस्टमुळे विविध चर्चांना उधाणा आले आहे. 

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ५ वेळा पटकावले विजेतेपद  

४२ वर्षीय धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने २०२३च्या शेवटच्या हंगामातही विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर अंतिम फेरीत त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला.

Web Title: Mahendra Singh Dhoni shared a post on Facebook and added to the suspense among the fans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.