Join us  

Ruturaj Gaikwad - १८ चौकार, ६ षटकार! ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केलं बेहाल, झळकावले आणखी एक शतक

Maharashtra vs Assam : एका षटकात ७ षटकार खेचून विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:16 PM

Open in App

Maharashtra vs Assam : एका षटकात ७ षटकार खेचून विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. आसामविरुद्धच्या आजच्या सामन्यातही ऋतुराजने शतक झळकावले. विजय हजारे ट्रॉफी २०२२मध्ये ऋतुराजने ९ इनिंग्जमध्ये ६ शतकं व १ द्विशतक झळकावले आहे. मागील चार सामन्यांत ऋतुराजने १२४* ( वि. रेल्वे), ४० ( वि. बंगाल), २२०* ( वि. उत्तर प्रदेश) आणि १०१* ( वि. आसाम) अशी कामगिरी केली आहे. आजही त्याने आसामच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राला दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी ( ३) याच्या रुपाने धक्का बसला. त्यानंतर ऋतुराज व एस बछाव यांनी डाव सावरला. बछाव ५२ चेंडूंत ४१ धावांवर माघरी परतल्यानंतर ऋतुराजच्या सोबतीला अंकित बावणे खिंड लढवताना दिसला. ऋतुराजने ८८ चेंडूंत शतक पूर्ण केले. आजही तो द्विशतक झळकावेल असे वाटत असताना रियान परागने त्याची विकेट घेतली. ऋतुराजने१२६ चेंडूंत १६८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १८ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. बावणे ७६ चेंडूंत ९४ धावांत खेळतोय आणि महाराष्ट्राच्या ४६ षटकांत ३ बाद ३१६ धावा केल्या आहेत. 

ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी136(112)154*(143)124(129)21(18)168(132)124*(123)40(42)220*(159) in Quarter-final 168(126) in Semi-final

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :विजय हजारे करंडकऋतुराज गायकवाड
Open in App