"मुंबईत राहतो, मराठी तर येणारच…" अभिनेत्रीनं शेअर केला हिटमॅन रोहित शर्माचा 'तो' खास व्हिडिओ

 रोहितचं मुंबई अन् मराठीवरील प्रेम, अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडिओ चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 22:41 IST2026-02-17T22:24:12+5:302026-02-17T22:41:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Maharaschi Hasya Jatra Fame Actress Namrata Sambherao Meets Cricketer Rohit Sharma With Team Hitman Show Love Marathi Language Mumbai Watch Video | "मुंबईत राहतो, मराठी तर येणारच…" अभिनेत्रीनं शेअर केला हिटमॅन रोहित शर्माचा 'तो' खास व्हिडिओ

"मुंबईत राहतो, मराठी तर येणारच…" अभिनेत्रीनं शेअर केला हिटमॅन रोहित शर्माचा 'तो' खास व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माहा क्रिकेट पासून दूर असला तरी तो सातत्याने चर्चेत असतो. फलंदाजीतील फटकेबाजीसह आणि फिल्डबाहेरील 'बोलंदाजी'च्या हटके शैलीनं तो अनकेदा अनेकदा लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येनं गर्दी करतात. त्याचे साधेपण आणि बोलण्यातील लहेजा हा त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित करत असतो. आता रोहित शर्माचा एक नवा व्हिडिओ चर्चत आहे. ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे त्या अभिनेत्रीने आपल्या टीमची रोहित शर्माशी झालेली भेट आणि हिटमॅन रोहित शर्मानं मराठीत केलेल्या गप्पा गोष्टींचा व्हिडिओ शेअर केला आहे. यातून रोहित शर्माचं मुंबई आणि मराठीवरील प्रेम दिसून येते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मराठमोळ्या कलाकार अन् रोहित शर्माची ग्रेट भेट

'थेट तुमच्या घरातून' या मराठी नाटकातील कलाकारांची आणि हिटमॅन रोहित शर्मा यांची नुकतीच ग्रेट भेट झाली. अभिनेत्री नम्रता संभेराव हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या भेटीतील खास क्षण शेअर केला आहे. यात प्रसाद खांडेकरसह अन्य कलाकारही उपस्थितीत असल्याचे दिसते. रोहित शर्माचा कॅज्युअल लूक आणि त्याची मराठी बोली यामुळे ही भेट आणखी खास ठरली.
 

 रोहितचं मुंबई अन् मराठीवरील प्रेम, अभिनेत्रीनं शेअर केलेला खास व्हिडिओ चर्चेत 


रोहित शर्माला भेटीत अभिनेत्री नम्रता त्याला कसे आहात? असा प्रश्न विचारते? यावर रोहित शर्मा मज्जेत आहे, असे म्हणत कलाकारांसोबत मराठीत गप्पा मारण्यास सुरुवात करतो. तुम्ही बऱ्याचदा मराठी बोलता. त्यामुळे मी मराठीत बोलत आहे, असे अभिनेत्री रोहित शर्माला स्पष्टीकरणही देते. यावर रोहित शर्मा आपल्या शैलीत काही नाही समजते मला म्हणत गप्पा सुरु ठेवतो. एवढेच नाही तर  रोहितनं जो रिप्लाय दिला तो कलाकांना तर भावलाच. पण प्रत्येक मराठी माणसाला आणि खास करून मुंबईकराच्या मनाला भिडणारा होता. कारण "मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच." असे रोहित यावेळी म्हणाला. अभिनेत्रीने शेअर केलेला हिटमॅनचा  व्हिडिओ सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फलंदाजीसारखा हिट ठरताना दिसतोय.   

Web Title: Maharaschi Hasya Jatra Fame Actress Namrata Sambherao Meets Cricketer Rohit Sharma With Team Hitman Show Love Marathi Language Mumbai Watch Video