Join us  

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये 'कार्तिक'चे खणखणीत शतक

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. येथे ते तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 5:14 PM

Open in App

तामिळनाडूः भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. येथे ते तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघातून केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांना वगळण्यात आले आहे. प्रथमच वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला डच्चू देण्यात आला असून यापुढे त्याच्या नावाच विचार होईल, याची शक्यताही कमी आहे. दिनेश कार्तिकची कारकिर्द अस्ताच्या दिशेनं होत असताना क्रिकेट क्षेत्रात नवा कार्तिक उदयास येत आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी अरुण कार्तिकच्या शतकी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केले. सिएचेम मदुराई पँथर्स आणि कोव्हाई किंग्स यांच्यातील लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. किंग्सने नाणेफेक जिंकून पँथर्सना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण, त्यांचा हा निर्णय चुकला. पँथर्सचा सलामीवीर अरुण कार्तिकने त्यांच्या गोलंदाजांची धुलाई केली. कार्तिकने 61 चेंडूंत 13 चौकार व 4 षटकार खेचून 106 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पँथर्सने 5 बाद 195 धावांचे लक्ष्य उभे केले. कौशिक जे. याने 23 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 43 धावांची खेळी केली.

Video : भारताच्या गोलंदाजाचा 'मलिंगा' स्टाईल यॉर्करश्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगानं मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला रामराम केला. बांगदालेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली, तशी घोषणा त्यानं आधीच केली होती. श्रीलंकेनेही त्याला विजयी निरोप दिला. पण, गेली अनेक वर्ष जगभरातील गोलंदाजांना प्रेरित करणाऱ्या मलिंगाची मोहिनी अजूनही कायम आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जी पेरियास्वामी हा देसी मलिंगा भारताला सापडला आहे. सध्या त्याच्याच गोलंदाजीची चर्चा आहे आणि सोमवारी झालेल्या सामन्यात त्याचा यॉर्कर पाहून मलिंगाची आठवण होण्यापासून स्वतःला रोखणं, कोणत्याही क्रिकेटपटूला जमणार नाही. जी पेरियास्वामी हा तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चेपॉक सुपर गिल्‍लीजकडून खेळतो.   

टॅग्स :तामिळनाडूटी-20 क्रिकेटदिनेश कार्तिक