नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अव्वल यष्टिरक्षक फलंदा महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०१९ च्या विश्वचषकानंतर धोनीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- माहीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा,
माहीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा,
भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अव्वल यष्टिरक्षक फलंदा महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 20:12 IST