चेन्नई - गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने पहिले दोन सामने जिंकत आयपीएलमधील आपल्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, संघाची कामगिरी चांगली होत असल्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीही निश्चिंत असून, धोनी आणि त्याच्या मुलीचे एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या मुलीला एक खेळ शिकवत आहे. पण हा खेळ क्रिकेट नाही बरं का. तर धोनी आपल्या मुलीला सध्या कॅरम शिकवत आहे. त्याचे हे छायाचित्र चेन्नईच्या आयपीएल इन्स्टाग्राम पेजवरही शेअर करण्यात आला आहे.
या छायाचित्रामध्ये धोनी त्याची मुलगी झिवासोबत कॅरम खेळताना दिसत आहे. त्यात एकीकडे धोनी बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला झिवा बसली आहे. तसेच दोघेही स्ट्रायकरच्या मदतीने निशाणा लावताना दिसत आहे.
धोनी आणि झिवाचा व्हायरल झालेले हे काही पहिलेच छायाचित्र नाही. हल्लीच धोनी झिवासोबत विविध भाषांमध्ये बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायर झाला होता. हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत होता. त्याशिवाय धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेरअ केला आहे. ज्यात तो आपली मुलगी झिवासोबत बीचवर मस्ती करताना दिसत आहे.