Join us  

Steve Smith, BBL 2023 Video: एवढं भारी नशिब.... स्टंपला बॉल लागूनही राहिला Not Out, मग ठोकलं शतक

स्टीव्ह स्मिथला मिळालेल्या जीवनदानाचं त्याने सोनं केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 6:49 PM

Open in App

Steve Smith, BBL 2023 Video: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने नुकतेच टी२० मध्ये झंझावाती शतक (Steve Smith Century in T20) झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) खेळताना स्टीव्ह स्मिथने जोरदार फटकेबाजी केली. त्याने अतिशय दमदार गोलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या तर उभारून दिलीच पण त्यासोबतच त्याने दमदार शतकही ठोकले. ५६ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने सामनावीराचा किताबही मिळवला. पण त्याच्या शतकात नशीबाची तगडी साथ लाभली.

नक्की काय घडलं?

सिडनी सिक्सर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात दुसरे षटक सुरू होते. स्टीव्ह स्मिथ २ चेंडूत २ धावांवर खेळत होता. त्यावेळी गोलंदाजाने चेंडू टाकला. त्याने तो चेंडूत न टोलवता केवळ हळून बॅटने रोखला आणि एक धाव चोरण्यासाठी धावला. चेंडू मात्र वेगाने आल्यामुळे बॅटला लागून स्टंपच्या दिशेने गेला. चेंडू स्टंपला लागणार याची स्मिथला कल्पना आली पण तो धाव काढण्यासाठी पुढे निघाला होता. त्यामुळे चेंडू अडवण्याआधीच स्टंपला लागला पण तरीही स्टंपवरील बेल्स न पडल्याने त्याला जीवनदान मिळाले. पाहा व्हिडीओ-

त्यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथने आपला रूद्रावतार दाखवून दिला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाने प्रथम फलंदाजी केली. स्टीव्ह स्मिथने त्याच संघाकडून आपले शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथने सलामीला फलंदाजी करताना, गोलंदाजांचा समाचार घेतला. स्टीव्ह स्मिथने मैदानात चहुबाजूंना धावांचा तुफान पाऊस पाडला. त्याने आपले शतक दमदार पद्धतीत पूर्ण केले. हे त्याचे टी२० मधील दुसरे शतक ठरले. त्याने ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५६ चेंडूत १०१ धावा केल्या.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबिग बॅश लीग
Open in App