कोहलीसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे नशिबवान

केन विलियम्सन : खेळ व मैदानावरील वर्तन थोडे वेगळे असले तरी काही बाबतीत आमचे विचार मिळतेजुळते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:21 AM2020-06-08T02:21:14+5:302020-06-08T02:21:28+5:30

whatsapp join usJoin us
Lucky to have the opportunity to play with Kohli | कोहलीसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे नशिबवान

कोहलीसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे नशिबवान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विलियम्सन व कोहली दोघेही मलेशियामध्ये २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारताने जेतेपद पटकावले होते. आता हे दोघेही क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाज मानले जातात.

मुंबई : विराट कोहलीसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन स्वत:ला नशिबवान समजतो. भारतीय कर्णधाराच्या क्रिकेट प्रवासाच्या युवा कालखंडापासून त्याच्यासोबत जुळलो असल्याचे विलियम्सन म्हणाला. स्टार स्पोटर््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना विलियम्सन म्हणाला, ‘युवा अवस्थेतच कोहलीसोबत भेटणे आणि त्यानंतर त्याची प्रगती व क्रिकेट प्रवासाचे अनुकरण करणे शानदार ठरले आहे.’

कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंडर-१९ विश्वकप २००८ मध्ये विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. या विश्वकप स्पर्धेत रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी हेसुद्धा सहभागी झाले होते.
विलियम्सन म्हणाला, ‘आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. पण खरे सांगायचे झाल्यास गेल्या काही वर्षांत आम्ही खेळावर आपले विचार शेअर केले. खेळ व मैदानावरील वर्तन थोडे वेगळे असले तरी काही बाबतीत आमचे विचार समान आहेत.’ (वृत्तसंस्था)
 

Web Title: Lucky to have the opportunity to play with Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.