LSG vs GT Shubman Gill Celebrates Like A Kid After Finally Winning The Toss : लखनौच्या स्टेडियमवर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स विरुद्ध रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलच्या १९ व्या हंगामातील १९ सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर शुभमन गिलनं केलेले सेलिब्रेशन लक्षवेधी ठरले. टीम इंडियाचे नेतृत्व करताना सातत्याने टॉस गमावल्यावर IPL मध्ये GT संघाचे नेतृत्व करतानाही नाणेफेकीवेळी सातत्याने त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे पंतसमोर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागल्यावर शुभमन गिल जल्लोष करताना दिसून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिलची रिॲक्शन व्हायरल
पंतसमोर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागल्यावर गिलनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर जे घडलं ते अधिक चर्चेत आलं. ब्रॉडकास्टरशी बोलून झाल्यानंतर कॅमेऱ्यात गिलने दोन्ही हात वर करून मोठ्या स्मितहास्यासह हसत आनंद व्यक्त केला. त्याची निरागस रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
दोन्ही संघ सेम गेम प्लॅनसह उतरले मैदानात
गुजरात टायटन्सनेच्या संघाने याआधी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात एका धावेनं विजय नोंदवला होता. दुसरीकडे लखनौचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या विजयासह मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघ या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
लखनौ सुपर जाएंट्स प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, एडन मार्करम, रिषभ पंत (कर्णधार व यष्टिरक्षक), आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव.
- इम्पॅक्ट प्लेयर : मणिमारन सिद्धार्थ, जॉर्ज लिंडे, मॅथ्यू ब्रीट्झके, शहबाज अहमद, मयंक यादव
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
- इम्पॅक्ट प्लेयर : शाहरुख खान, मानव सुथार, जेसन होल्डर, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत