Join us
Daily Top 2Weekly Top 5

LSG vs DC : पृथ्वीसह अर्जुन तेंडुलकरही बाकावर! मोहम्मद शमीसह पाच भिडूंची नव्या संघाकडून नवी इनिंग

दिल्लीनं पृथ्वीला बसवलं बाकावर, सलामीराच्या रुपात श्रीलंकन बॅटरला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:37 IST

Open in App

Arjun Tendulkar Prithvi Shaw Not In LSG vs DC Playing 11 : लखनौच्या एकाना स्टेडियमवरील IPL २०२६ स्पर्धेतील पाचव्या सामन्यातून लखनौ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ यंदाच्या हंगामाची सुरुवात करत आहे. यजमान लखनौविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्लीनं पृथ्वीला बसवलं बाकावर, सलामीराच्या रुपात श्रीलंकन बॅटरला संधी

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाकडून IPL मधील स्टार नितीश राणासह डेविड मिलर एनिग्डी  नव्या संघाकडून नव्या इनिंगची सुरुवात करत आहेत. याशिवाय पृथ्वी शॉला बाकावर बसवून दिल्लीनं श्रीलंकेच्या पथुम निसंका याला सलामीवीराच्या रुपात पसंती दिली आहे. 

"मी टीकेला घाबरत नाही"; अर्जुन तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाला- "गोव्यात माझ्या घरी..."

LSG कडून अर्जुन तेंडुलकर वेटिंगवर, मोहम्मद शमीची नवी सुरुवात

लखनौच्या संघाकडून मोहम्मद शमी पुन्हा एकदा मैदानात गाजवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गत हंगामात तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसला होता. याशिवायही त्याने पंजाबसह अन्य संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. एका बाजूला ट्रेड डीलच्या माध्यमातून संघात घेतलेल्या अनुभवी शमीला संधी मिळाली. दुसरीकडे याच खेळात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून लखनौचा झालेला अर्जुन तेंडुलकरला मात्र बाकावरच बसावे लागले.    दिल्ली कॅपिटल्स  प्लेइंग इलेव्हन 

केएल राहुल (यष्टीरक्षक फलंदाज), पथुम निसंका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, विपराज निगम, लुंगी एनिग्डी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार. 

  • दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर : आशुतोष शर्मा, औकिब नबी, समीर रिझवी, दुष्मंथा चमीरा, करुण नायर

लखनौ सुपर जायंट्स  प्लेइंग इलेव्हन 

एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (यष्टीरक्षक फलंदाज), आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहसीन खान, मोहम्मद शमी, एनरिक नॉर्टजे, प्रिन्स यादव

  • लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेयर: दिग्वेश राठी, आवेश खान, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, अक्षत रघुवंशी 
English
हिंदी सारांश
Web Title : LSG vs DC: Prithvi benched; Shami debuts for Lucknow.

Web Summary : Delhi Capitals chose to bowl first, benching Prithvi Shaw for Pathum Nissanka. Lucknow benched Arjun Tendulkar, while Mohammed Shami debuted for the team.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४अर्जुन तेंडुलकरपृथ्वी शॉमोहम्मद शामी