लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर १ एप्रिल २०२६ रोजी खेळल्या गेलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैदानावर खेळाडूंचा थरार सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सामन्याच्या उत्तरार्धात प्रेक्षकांच्या एका गॅलरीमध्ये दोन गटात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर लवकरच लाथाबुक्क्यांनी आणि एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांचे कपडे ओढताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. स्टेडियममधील हा गोंधळ पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याने या भांडणात पडत दोन्ही गटांना वेगळे केले आणि राडा थांबवला. या गोंधळामुळे काही काळ सामन्यावरून प्रेक्षकांचे लक्ष विचलित झाले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, मैदानावरील खेळाचा आनंद घेण्याऐवजी असा हिंसकपणा करणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणात किती जणांवर कारवाई करण्यात आली, याची अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. मात्र, आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत अशा घटनांमुळे क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीचा दणदणीत विजय
एकीकडे स्टँड्समध्ये राडा सुरू असताना, मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने वर्चस्व गाजवले. लखनौ सुपर जायंट्सने दिलेले १४२ धावांचे आव्हान दिल्लीने ६ विकेट्स राखून पूर्ण केले. समीर रिझवीने नाबाद ७० धावांची तुफानी खेळी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, ट्रिस्टन स्टब्सने ३२ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी दिल्लीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दोघांनी मिळून नाबाद ११९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि १७.१ षटकांतच दिल्लीला विजय मिळवून दिला.
Web Summary : A fan brawl marred the Lucknow Super Giants vs. Delhi Capitals match at the Ekana Stadium. The fight, reportedly over a minor dispute, caused panic before police intervened. Delhi Capitals won the match convincingly.
Web Summary : लखनऊ के इकाना स्टेडियम में लखनऊ सुपर जायंट्स बनाम दिल्ली कैपिटल्स के मैच में प्रशंसकों के बीच लड़ाई हो गई। मामूली विवाद के कारण हुई इस लड़ाई से दहशत फैल गई, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया। दिल्ली कैपिटल्स ने मैच आसानी से जीत लिया।