IPL 2026, LSG Announced George Linde Replacement Of Wanindu Hasaranga : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात सलग दोन विजयासह दमदार कमबॅक करणाऱ्या लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेला अष्टपैलू वानिंदु हसरंगा याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामात खेळण्यासंदर्भात संभ्रम होता. अखेर लखनौच्या संघाने श्रीलंकन मॅच विनर स्पर्धेतून आउट झाल्याची पुष्टी करताना त्याच्या जागी बदली खेळाडूचीही घोषणा केली आहे. हसरंगाच्या जागी LSG च्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेला पसंती दिली आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीसह तो पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG नं अधिकृतरित्या केली बदली खेळाडूची घोषणा
लखनौ सुपर जाएंट्सचा संघ १२ एप्रिलला पुढचा सामना खेळणार असून या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा ३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू संघात सामील होईल, अशी आशा आहे. LSG संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेटर टॉम मूडी यांनी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर वानिंदू हसरंगा यंदाच्या हंगामाला मुकणार असल्याची माहिती दिली होती. त्याच्या जागी बदली खेळाडूचा शोध सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले होते. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूला त्याच्या जागी IPL मध्ये संधी मिळाली आहे.
Mukul Choudhary Records : IPL मधील नवा फिनिशर! मुकुल चौधरीनं एका डावात दोन विक्रमांसह रचला इतिहास
जॉर्जला पहिल्यांदाच मिळाली आयपीएल खेळण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याच्याकडे टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव असून त्याला पदार्पणाची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. जॉर्ज लिंडे याने आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत एकूण २५० सामन खेळले असून त्याच्या खात्यात २१८ विकेट्सची नोंद आहे. याशिवाय त्याच्या खात्यात ४ अर्धशतकेही आहेत. त्यामुळे तो फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३ कसोटी, ४ वनडे आणि ३७ टी-२० सामने खेळले आहेत.