Join us  

बाबो! ही कॅच नाही पाहिली तर काहीच नाही पाहिलं; पाहा भारताच्या या सुपरगर्लचा पराक्रम

या व्हिडीओमध्ये भारताच्या एका सुपरगर्लने सीमारेषेवर उडी मारून भन्नाट कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:07 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या एका सुपरगर्लने सीमारेषेवर उडी मारून भन्नाट कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताच्या महिलांचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. पण या सामन्याच्या निकालापेक्षा ही कॅच चांगलीच गाजत आहे.

या सामन्यात भारताची क्रिकेटॉपटू हरमनप्रीत कौरने सीमारेषेवर हवेत उडी मारून एका हाताने कॅच घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतवेस्ट इंडिज