Join us

लोकेश राहुलपूर्वी पाच भारतीय सलामीवीर पहिल्या चेंडूवर झालेत बाद

श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर के.एल राहुल पहिल्या चेंडूवर बाद. लकमलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:31 IST

Open in App

कोलकाता -  श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर के.एल राहुल पहिल्या चेंडूवर बाद झाला. लकमलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. कोलकाताच्या मैदानात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल तिसरा सलामीवीर आहे. यापूर्वी भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक आणि सुनील गावसकर ईडनगार्डनच्या मैदानावरच पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. या दोन्ही सलामवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारा लोकेश राहुल हा सहावा भारतीय सलामीवीर आहे. यापूर्वी लिटल मास्टर सुनील गावसकर, वासिम जाफर, सुधीर नाईक,  डब्लू व्ही रमण आणि शिव सुंदर दास हे भारतीय फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत. सुनील गावसकर तब्बल तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले होते.  

ईडन गार्डनच्या मैदानावर 1974 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात सुधीर नाईक पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. रॉबर्ट्सने एका अप्रतिम चेंडूवर त्यांना यष्टीरक्षक मेरीकरवी झेलबाद केले होते. भारताने हा सामना 85 धावांनी जिंकला होता. इतर फलंदाजांमध्ये शिव सुंदर दास हा वेस्ट इंडिजच्या डिलॉनचा बळी ठरला. तर जाफरला बांगलादेशच्या मोर्तुझाने पहिल्या चेंडूवर तंबूत धाडले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रमण यांना पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची वेळ आली होती.

पहिल्या कसोटीत भारताची दयनिय अवस्था -पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर झाला असून, श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांसह कर्णधार विराट कोहलीसुद्धा झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला आहे.   सुरंगा लकमलने पहिल्याच षटकात लोकेश राहुलची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ शिखर धवनला 8 धावांवर माघारी धाडत लकमलने श्रीलंकन संघाला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा निराशा केली. तो वैयक्तिक शून्य धावसंख्येवर लकमलची तिसरी शिकार झाला.  पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3 बाद 17 धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारा 8 धावांवर खेळत होता. तर अजिंक्य रहाणेने अद्याप खाते उघडलेले नव्हते. 

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयश्रीलंकालोकेश राहुल