Join us

'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...

राहुल आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. आकांक्षा ही आलिया भटची चांगली मैत्रिण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:32 IST

Open in App

नवी दिल्ली : कॉफी विथ करण, या कार्यक्रमामध्ये अश्लील वक्तव्य केल्यानंतर भारताचा फलंदाज लोकेश राहुल चांगलाच ट्रोल झाला होता. पण आता त्याचे 'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर डेटिंग सुरु असल्याचे वृत्त पसरले होते. पण हे वृत्त खरे आहे का, जाणून घ्या...

राहुल आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. आकांक्षा ही आलिया भटची चांगली मैत्रिण आहे. आकांक्षाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघांची जेवढी जवळीक आहे, ते पाहता त्यांच्यामध्ये अफेअर सुरु आहे, असे चाहते म्हणत होते. पण आता तर 'जन्नत' फेममधील अभिनेत्रीबरोबर राहुलचे नाव जोडले जात आहे.

सध्याच्या घडीला राहुल चांगल्या फॉर्ममध्ये नाही. भारतीय संघातून राहुलला बाहेर काढले आहे. 'जन्नत' फेम सोनल चौहानने राहुलला एक संदेश पाठवत आपली मनातील इच्छा बोलून दाखवली होती. राहुल हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल आणि संघात स्थान पटकावेल, असे सोनलने म्हटले होते. यानंतर राहुल आणि सोनल यांच्यामध्ये अफेअर सुरु असून ते दोघे डेटिंग करत असल्याचे म्हटले जाऊ लागले.

सोनलने मात्र राहुलबरोबरचे नाते उलगडले नाही. या नात्यावर तिने भाष्य करणे टाळले. सोनल म्हणाली की, " राहुल हा एक चांगला माणूस आहे. त्याचबोरबर तो एक गुणवान क्रिकेटपटू आहे. पण माझ्या आणि राहुलमध्ये तुम्ही जसे समजता तसे काहीही नाही."

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड यांच्यामध्ये वेगळेच नाते आहे. कारण आतापर्यंत क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या अफेअर्सचे किस्से चांगलेच रंगले आहेत. काही क्रिकेटपटूंनी तर बॉलिवूडमधील अभिनेत्रींबरोबर लग्नही केले आहे. पण सध्याच्या घडीला चर्चा आहे ती भारतीय संघातील लोकेश राहुलची. कारण बॉलीवूडच्या अभिनेत्रीबरोबर त्याचे अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी  कॉफी विथ करण या कार्यक्रमात लोकेश राहुलने अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भारतीय संघातून त्याची हकालपट्टीही करण्यात आली होती. पण या गोष्टीमधून त्याने कोणताच धडा घेतला नसल्याचे पाहायला मिळते आहे.

टॅग्स :लोकेश राहुलकॉफी विथ करण 6