Lionel Messi Meets Sachin Tendulkar At Wankhede Stadium : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) सध्या भारत दौऱ्यावर आहे. फुटबॉल जगतातील आपली जादू दाखवणाऱ्या या खेळाडूनं रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील खास कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटीगाठीत फुटबॉलच्या जादूगार आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट सर्वात लक्षवेधी आणि अविस्मरणीय क्षणाची अनुभूती देणारी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरनं मेसीला दिलं खास गिफ्ट
या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकर याने आपलं नाव असलेली टीम इंडियाची जर्सी मेस्सीला गिफ्टच्या स्वरुपात दिली. रिटर्न गिफ्टच्या स्वरुपात मेस्सीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २०२६ फीफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अधिकृत फुटबॉल गिफ्ट केल्याचे पाहायला मिळाले. आपापल्या क्षेत्रात १० नंबर जर्सीसह दबदबा दाखवून देणाऱ्या दोन दिग्गजांनी एकत्र फोटोही काढले. या फोटोसह तेंडुलकर-मेस्सी जोडीचा एका फ्रेममधील अविस्मरणीय क्षणाचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात मेस्सीनं भारतीय फुटबॉलमधील दिग्गज सुनिल छेत्रीसह अनेक प्रसिद्ध बॉलिवूडकरांनीही मेस्सीची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले दिली.
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
कोलकाता शहरातून मेस्सीनं केली भारत दौऱ्याची सुरुवात
शनिवारी कोलकाता येथून मेस्सीनं भारत दौऱ्याची सुरुवात झाली. कोलकाता येथे मेस्सी त्याच्या पुतळ्याचे उद्घाटनही केले. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियम (विवेकानंद युवा भारती क्रीडांगण) येथे चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये तोडफोड केल्याचा प्रकारही घडला. ही गोष्ट त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.