Join us  

एका रात्रीत बदलले दीपक चहरचे आयुष्य; नेमकं घडलं तरी काय...

एका रात्रीत नेमकं असं घडलं तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 11:23 AM

Open in App

मुंबई : फक्त एक क्षण तुमचे आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे ठरू शकते. पण आता तर एका रात्रीत भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचे आयुष्य बदलल्याचे म्हटले जात आहे. पण एका रात्रीत नेमकं असं घडलं तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल...

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत वेगवान दीपक चहारने आपली छाप पाडली. नेत्रदीपक गोलंदाजी करत चहरने सर्वांची मने जिंकली. धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. त्यामुळे आता त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांचे संघातील स्थान पक्के झाल्याचे समजते. पण काही खेळाडूंचे स्थान मात्र आता धोक्यात आले असल्याचेही म्हटले जात आहे.

दीपकला सुरुवातीला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पाहिले गेले. चेन्नईमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण भारतीय संघात सातत्यपूर्ण कामगिरी करत असतानाही त्याचे संघातील स्थान निश्चित समजले जात नव्हते. पण मग एका रात्रीत असे नेमके घडले तरी काय...

बांगलादेशविरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना दीपकसाठी फार मोलाचा ठरला. या सामन्यात दीपकने हॅट्ट्रिकसह सहा बळी मिळवले आणि क्रिकेट विश्वाने त्याची दखल घेतली. या पराक्रमानंतर बीसीसीआयनेही त्याचे कौतुक केले. या एका रात्रीत दीपक स्टार झाल्याचे म्हटले जात आहे. पण दीपकचे भारतीय संघातील स्थान निश्चित राहील का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

बीसीसीआयला क्रिकेट विक्रमांचाच विसर; महिला काँग्रेसने आणले भानावरमुंबई : एखाद्या क्रीडा संघटनेला आपल्या खेळाबद्दल सर्व माहिती असणे गरजेचे असते. पण जगातील सर्वात मोठी समजली जाणारी संघटना असलेल्या बीसीसीआयलाच आपल्या खेळातील विक्रमांचा विसर झाल्याचे पाहायला मिळाले. पण बीसीसीआयची ही चूक झाल्यावर त्यांना महिला काँग्रेसने भानावर आणल्याचे पाहायला मिळाले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत वेगवान दीपक चहारने आपली छाप पाडली. नेत्रदीपक गोलंदाजी करत चहरने सर्वांची मने जिंकली. बीसीसीआयने एक ट्विट करत दीपकने भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली, असे लिहिले होते. बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनीदेखील याच प्रकारचे ट्विट करत दीपकचे अभिनंदन केले होते. पण महिला काँग्रेसने या दोघांचीही चूक झाल्याचे दाखवून दिले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एकता बिश्तने पहिली हॅट्ट्रिक घेतल्याचे दाखवून दिले.

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सबीसीसीआयभारत विरुद्ध बांगलादेश