Join us

राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:44 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. पण, रिलीज केलेल्या ( करारमुक्त) खेळाडूंवर लिलावात बोली लागणार आहे. पण, तत्पूर्वीच राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलेल्या टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूनं चक्क आयपीएल 2020 मधूनच माघार घेतली आहे. 

राजस्थान रॉयल्सनंइंग्लंडच्या लिएम लिव्हींगस्टोनला रिलीज केलं आणि त्यानं आता कौंटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यानं आयपीएलच्या पुढील मोसमात खेळणार नसल्याचे जाहीर केलं.  26 वर्षीय लिएमनं 2017 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केलं, परंतु त्याला संघातील स्थान कायम राखण्यात अपयश आलं. 2015मध्ये लिएमनं सर्वांच लक्ष वेधलं, त्यानं स्थानिक क्रिकेट सामन्यात 138 चेंडूंत 350 धावा चोपल्या होत्या. 2019मध्ये राजस्थान रॉयल्सनं त्याला करारबद्ध केलं होतं.

लिएम म्हणाला,''राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा अनुभव अविश्वसनीय होता. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला, बरंच काही शिकलो. आता मला रेड बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे कौंटी क्रिकेट खेळणार आहे. मला माझ्या खेळात सुधारणा करायची आहे, त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यावर माझा भर असेल.'' 

राजस्थान रॉयल - ए टर्नर, ओशाने थॉमस, एस रांजणे, पी चोप्रा, इश सोढी, ए बिर्ला, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी, लिएम लिव्हींगस्टोन, एस मिथून. 

किती बजेट मध्ये किती खेळाडू

  • चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)
  • दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी) 
  • किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)
  • कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)
  • राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)
  • मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)
  • सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी) 
टॅग्स :आयपीएल 2020राजस्थान रॉयल्सइंग्लंड