Join us

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहीले नितीन गडकरींना पत्र

या पत्रामध्ये सचिनने देशांतील अपघातांबद्दल लिहीले आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वार दर्जाहीन हेल्मेट वापरत असल्याचे सचिनने या पत्रात म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 15:34 IST

Open in App
ठळक मुद्देदेशभरातील 30 टक्के अपघात हे दुचाकीवर होत आहेत.

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये सचिनने देशांतील अपघातांबद्दल लिहीले आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वार दर्जाहीन हेल्मेट वापरत असल्याचे सचिनने या पत्रात म्हटले आहे.

सचिनने आतापर्यंत संसदेमध्ये जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. संसदेमध्ये त्याने कधी भाषण केल्याचे कुणाच्याही लक्षात नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचा रोष त्याने ओढवून घेतल आहे. संसदेमध्ये गेल्यावर सचिनकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याने अपेक्षा भंग केल्याचेच म्हटले जात आहे.

आपल्या या पत्रामध्ये सचिनने म्हटले आहे की, " देशातील 70 टक्के दुचाकीस्वार हे बनावट हेल्मेट वापरत आहेत. बनावट हेल्मेट बनावणाऱ्या कंपनीवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर देशभरातील 30 टक्के अपघात हे दुचाकीवर होत आहेत. त्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घालायला हवे. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना जर हेल्मेट चांगले नसेल तर खेळाडूचा जीव जाऊ शकतो. तसेच दुचाकीस्वारांचेही आहे. जर त्यांच्याकडे चांगले हेल्मेट नसेल तर त्यांच्याही जीवान धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा फार गंभीर विषय आहे, तुम्ही या गोष्टीची दखल नक्कीच घ्याल"

 

टॅग्स :सचिन तेंडूलकर