Join us

भारताविरुद्धही आक्रमक मानसिकेतेने खेळू - बेन स्टोक्स

तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा ७ गड्यांनी पराभव केल्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘भारत  वेगळा विरोधी संघ आहे, आम्हाला मालिका अनिर्णित  ठेवायची असल्याने विजयासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळलो त्याच मानसिकतेने आम्ही उतरू.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:24 IST

Open in App

लंडन : कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने व्हाईट वॉश केल्यानंतर बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचे पुढील मिशन भारताविरुद्ध एकमेव कसोटी खेळणे हे असेल. २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर शेवटची कसोटी पुढे ढकलण्यात आली होती. ही कसोटी आता १ जुलैपासून एजबस्टन मैदानावर खेळविली जाणार आहे कसोटीआधी स्टोक्सने भारतीय संघाला इशारा देत सांगितले की आमचा संघ भारताविरुद्ध याच मानसिकतेने उतरेल. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा ७ गड्यांनी पराभव केल्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘भारत  वेगळा विरोधी संघ आहे, आम्हाला मालिका अनिर्णित  ठेवायची असल्याने विजयासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळलो त्याच मानसिकतेने आम्ही उतरू. भारताविरुद्ध आमचा संघ ताजातवाना असेल. ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेयरस्टो आणि  जेम्स ॲन्डरसन  यांच्यासह स्वत: स्टोक्स नव्या दमाने उतरणार आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध क्लीन स्वीप करणे ही तर नवी सुरुवात आहे. त्यासाठी सहकाऱ्यांच्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो.’ 

टॅग्स :बेन स्टोक्सभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App