नवी दिल्ली : बीसीसीआयच्या १ डिसेंबर रोजी होणा-या विशेष आमसभेपूर्वी भारतीय संघाच्या भविष्यातील दौ-याची (एफटीपी) मला माहिती हवी, या आशयाचे पत्र नाराज कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना लिहिले आहे.
एसजीएममध्ये ज्या तीन मुद्यांवर चर्चा होईल त्यात २०१९ ते २०२३ या कायातील एफटीपीचा देखील समावेश आहे. या पत्रात चौधरी यांनी घाईघाईत आंतरराष्टÑीय वेळापत्रक तयार केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय किती घाईत घेतले जातात, याबद्दल त्यांनी पत्रात आश्चर्य व्यक्त केले.
दौरा निश्चित केला असेल तर
सर्व सदस्यांना नोटीससोबत
दौºयाची माहिती देखील पुरवायला हवी होती, असे त्यांचे मत आहे. हरियाणा क्रिकेट संघटनेचे प्रमुख असलेले अनिरुद्ध चौधरी यांनी
घाईत घेतलेल्या निर्णयास
जबाबदार कोण? दौºयाचे दस्तावेज दडविण्यात का आले, असे आक्षेप नोंदविले. (वृत्तसंस्था)