Join us

लेहमन यांच्याकडे युवा खेळाडूंना घडविण्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:43 IST

Open in App

मेलबोर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार होण्याची नामुष्की पत्करणारे डॅरेन लेहमन यांना क्रिकेट आॅस्ट्रेलियाने नवी जबाबदारी सोपविली आहे.राष्टÑीय परफॉर्मर्न्स कार्यक्रमांतर्गत डॅरेन लेहमन युवा खेळाडूंना घडविणार आहेत. मुख्य प्रशिक्षक ट्राय कूली यांचे सहायक म्हणून लेहमन काम करतील. राष्टÑीय संघाची जबाबदारी सांभाळण्याआधी लेहमन हे राष्टÑीय क्रिकेट अकादमीत होते. ते आता युवा खेळाडू विकास कार्यक्रमात योगदान देतील. डॅरेअन लेहमन यांना २०१९ पर्यंत आॅस्टेÑलियाच्या राष्टÑीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले होते.मार्च महिन्यात केपटाऊन कसोटीत चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्यांना पद सोडावे लागले. त्यांना या प्रकरणात मात्र क्लीन चिट देण्यात आली आहे. ‘सीए’नुसार लेहमन आॅक्टोबरपर्यंत नव्या पदावर काम करतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलिया