Join us  

Video : मिचेल जॉन्सनने शिवी दिली, युसूफ पठाणने धक्काबुक्की केली; Live मॅचमध्ये राडा अन्...

Legends League Cricket 2022: क्रिकेटमध्ये अनेकवेळा खेळाडू मैदानावर आपला संयम गमावताना दिसले आहेत. त्यांच्यावर बंदीही घातली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 9:28 AM

Open in App

Legends League Cricket 2022: क्रिकेटमध्ये अनेकवेळा खेळाडू मैदानावर आपला संयम गमावताना दिसले आहेत. त्यांच्यावर बंदीही घातली गेली आहे. असाच तणावाचा प्रकार लीजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडला, यावेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की केली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिचेल जॉन्सनचा स्वभाव निवृत्तीच्या अनेक वर्षांनंतरही बदललेला नाही. सामन्यादरम्यान पुन्हा एकदा त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला शिविगाळ करून डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी जॉन्सनची गाठ भारताचा माजी अष्टपैलू युसूफ पठाणशी पडली. भारतीय फलंदाजानेही जशासतसे उत्तर दिले आणि दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.  

लीजेंड्स लीग क्रिकेट दर्यान भिलवाडा किंग्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात जॉन्सन व पठाण यांच्यातला वाद सोडवण्यासाठी सहकारी खेळाडू व अम्पायरला मधस्थी करावी लागली.  पठाण फलंदाजी करत असताना जॉन्सनने त्याला शिवी दिली. ज्यावर तो चिडला आणि परिस्थिती आणखी बिघडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये पठाण जॉन्सनला रागाने उत्तर देताना दिसत आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जॉन्सनने पठाणला धक्काबुक्की केली. प्रकरण बिघडत असल्याचे पाहून पंचांनी मदतीला धावून येत दोन्ही खेळाडूंना वेगळे केले. त्यानंतर पठाणने पुढील तीन चेंडूंवर ६,४,६ अशी फटकेबाजी केली. जॉन्सने त्याच षटकात पठाणची विकेटही घेतली.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. २२७ धावांचे लक्ष्य गाठून इंडिया कॅपिटल्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.       

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :युसुफ पठाणटी-20 क्रिकेट
Open in App