Shoaib Akhtar biopic 'Rawalpindi Express' : पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर याच्या जीवनावर आधिरित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अख्तरने रविवारी सोशल मीडियावर 'Rawalpindi Express - Running against the odds' या नावाच्या बायोपिकचा टिझर पोस्ट केला. १६ नोव्हेंबर २०२३मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती अख्तरने त्याच्या सोशल अकाऊंटवरून दिली.
४६ वर्षी अख्तरने पोस्ट केलेल्या टिझरमध्ये शोएब नावाची जर्सी घातलेला खेळाडू रेल्वे रुळांवर पळताना दिसतोय. मुहम्मद फराज कैसर यांनी हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यू ट्युबवर या टिझरला फार कमी काळात ९ हजारांपर्यंत व्ह्यू मिळाले आहेत.
२९ नोव्हेंबर १९९७ मध्ये अख्तरने पाकिस्ताकडून कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. त्याने ४६ कसोटी, १६३ वन डे व १५ ट्वेंटी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्याच्या नावावर १७८ , वन डेत २४७ आणि ट्वेंटी-२०त १९ विकेट्स आहेत.