Join us  

टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी दिग्गज फिरकीपटूची वर्णी? एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ संपला

भारतीय संघाच्या निवड समितीच्या अक्ष्यक्षपदावर सध्या एमएसके प्रसाद विराजमान आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:00 AM

Open in App

भारतीय संघाच्या निवड समितीच्या अक्ष्यक्षपदावर सध्या एमएसके प्रसाद विराजमान आहेत. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या निवड समिती प्रमुखाची नियुक्ती करण्यात येईल. प्रसाद यांचा कार्यकाळ संपत असून त्यांच्या कामकाजावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असणाऱ्या प्रसाद यांना योग्य खेळाडूंची जाण कशी असेल असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यात वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात अंबाती रायुडूला बाकावर बसवून विजय शंकर आणि मयांक अग्रवाल यांना घेण्याचा निर्णय, अनेकांच्या पचनी पडलेला नव्हता. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुली विराजमान झाल्यानंतर प्रसाद यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. पण, प्रसाद यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडला जाईल आणि भारताच्या माजी फिरकीपटूच्या गळ्यात ही माळ पडेल, अशी माहिती समोर येत आहे. दक्षिण विभागातून प्रसाद यांच्या बदल्यात लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची निवड होईल, असे समजते आहे. त्यांच्याशिवाय या पदासाठी हैदराबाद आणि कर्नाटक राज्याकडूनही अनुक्रमे अर्षद आयुब व बेंकटेश प्रसाद शर्यतीत आहेत. पण, यात शिवरामकृष्ण हे आघाडीवर आहेत, त्यांना तामीळनाडूकडून जोरदार पाठींबा आहे. 

या शर्यातीत ज्ञानेंद्र पांडे हेही नाव आहेत. भारत आणि उत्तर प्रदेशचा माजी फलंदाज पांडे हे मध्य विभागातून गगन खोडाच्या जागी येतील. प्रसाद आणि खोडा यांच्या कार्यकाळ संपणार आहे. अन्य विभागाकडून आशिष नेहरा, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर ही नावंही चर्चेत आहेत. पश्चिम विभागातून अजित आगरकर आणि दिलीप वेंगसरकर हे नाव चर्चेत आहेत. पश्चिम विभागातून जतीन परांजपे हे सध्या निवड समितीत आहेत आणि त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगरकर आणि वेंगसरकर यांच्यात चुरस रंगण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला मुंबईतील मुख्यालयात होणार आहे. 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ