Join us

थायलंडमध्ये कॅप्टन कूल धोनीचा 'कूल' मूड; लेक झिवाने शेअर केली झलक, VIDEO

महेंद्रसिंग धोनीची भटकंती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:31 IST

Open in App

ms dhoni news : धोनी सध्या कुटुंबीयांसह भटकंती करत आहे. त्याची लेक झिवा धोनीने याची झलक शेअर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियाच्या या जगात सोशल मीडियापासून दूर असतो. पण, त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधत असते. याशिवाय साक्षीच चाहत्यांना आपल्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते.

सध्या क्रिकेटच्या विश्वापासून दूर असलेला धोनी थायलंडमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. क्रिकेटमधून ब्रेक घेत धोनी सध्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालवत आहे. त्याची मुलगी झिवा हिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये धोनी टी-शर्ट घालून समुद्राच्या पाण्यात उभा आहे. त्याची पत्नी साक्षी गुलाबी स्विमसूटमध्ये किनाऱ्यावर उभी असल्याचे दिसते.

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे. चाहत्यांना सर्वांत मोठा दिलासा धोनीच्या रूपाने मिळाला आहे. गेल्या सत्रापासून तो पुढच्या सत्रात खेळणार नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या; पण माहीने खेळण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने धोनीला 'अनकॅप्ड खेळाडू म्हणून चार कोटी रुपये दिले. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार धोनी हा आयपीएलचा पहिला 'व्हॅल्यू फॉर मनी' खेळाडू बनला. 

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी