Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम अ‍ॅशेस कसोटी : इंग्लंडवर पराभवाचे सावट, मार्श बंधूंचे शतक; लियोनचे दोन बळी

शॉन व मिशेल मार्श यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकानंतर नॅथन लियोनच्या अचूक माºयाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी अखेरच्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:24 IST

Open in App

सिडनी : शॉन व मिशेल मार्श यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकानंतर नॅथन लियोनच्या अचूक माºयाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी अखेरच्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल केली.आॅस्ट्रेलियाने मार्श बंधूच्या शतकांच्या जोरावर चौथ्या दिवशी पहिला डाव ७ बाद ६४९ धावांवर घोषित करीत ३०३ धावांची आघाडी घेतली. आज चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडची ४ बाद ९३ अशी अवस्था झाली होती.पहिल्या डावात ३४६ धावांची मजल मारणाºया इंग्लंडसाठी कर्णधार रुटची बोटाची दुखापत चिंतेचा विषय आहे. रुट दिवसअखेर ४२ धावा काढून नाबाद असून, त्याला जॉन बेयरस्टॉ १७ धावा काढून साथ देत आहे.लियोनने १९ षटकांत ३१ धावांच्या मोबदल्यात अ‍ॅलिस्टर कुक (१०) आणि डेव्हिड मलान (०५) यांना बाद केले. त्याआधी, मिशेल स्टार्क ने मार्क स्टोनमॅनला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर लगेच कुक सुदैवी ठरला. मार्शने कुकचा झेल सोडला. त्या वेळी तो वैयक्तिक पाच धावांवर खेळत होता. या जीवदानाचा मात्र त्याला लाभ घेता आला नाही. लियोनच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. दरम्यान, कुक १० धावांच्या खेळीदरम्यान १२ हजार कसोटी धावा फटकाविणारा सहावा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेत ३७६ धावा फटकावल्या. जेम्स विंस (१८) याला पॅट कमिन्सने बाद केले. त्याआधी, कालच्या ४ बाद ४७९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियातर्फे मार्श बंधू एकाच डावात शतक ठोकणाºया बंधूंमध्ये तिसरी जोडी ठरली. यापूर्वी गे्रग व इयान चॅपेल आणि स्टीव्ह व मार्क वॉ यांनी आॅस्ट्रेलियातर्फे एकाच डावात शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा बंधूंनी एकाच डावात शतके ठोकली आहेत.

टॅग्स :अॅशेस मालिकाइंग्लंडआॅस्ट्रेलिया