Lalit Modi Message To SRH Owner Kavya Maran : ‘द हंड्रेड’ लीगच्या लिलावातील एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सनरायझर्स फ्रेंचायझीने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याच्यावर २.३४ कोटी रुपयांची बोली लावली. भारतीयाची मालकी असलेल्या संघात पाकिस्तान खेळाडूला मिळालेली संधी अनेकांना खटकली. या निर्णयामुळे सनरायझर्सची मालकीण काव्या मारनला ट्रोलचा सामना करावा लागत आहे. यात आता तिच्यासाठी IPL संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदींच्या खास मेसेज चर्चेत आला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावून फसली काव्या मारन!
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकिय तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. २००९ पासून पाकिस्तानी खेळाडूंसाठी IPL चे दरवाजेही बंद झाले. आता हाच नियम परदेशी लीगमध्ये सह मालकी असणाऱ्या भारतीय फ्रँचायझी संघ मालकाने पाळावा, अशी अपेक्षा असताना द हंड्रेड स्पर्धेतील काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावला. लिलावातील हा खेळ वादग्रस्त ठरत असताना आता ललित मोदीचे ट्विट चर्चेत आले आहे.
'पाकिस्तान हेच पैसे भारतावर मिसाइल डागण्यासाठी वापरतील' अनिरुद्धाचार्य काव्या मारनवर भडकले!
ललित मोदीचं ट्विट, म्हणे "गरज पडली तर मला कॉल करा...."
या वादग्रस्त मुद्यावर आता आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदीने प्रतिक्रिया दिली आहे. एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करताना त्याने लिहिलंय की, आधीच चाहते नाराज असताना एखाद्या पाकिस्तानी खेळाडूवर इतकी मोठी रक्कम खर्च करणे योग्य निर्णय वाटत नाही. सार्वजनिक प्रतिमा कशी सांभाळायची याचा मला चांगला अनुभव आहे. गरज भासली तर मला कॉल करा, असा टोमणा ललित मोदीनं काव्या मारनला मारल्याचे दिसते. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
वादग्रस्त मुद्याचा IPL दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या संघालाही बसू शकतो फटका
काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही काव्या मारनच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूसाठी पैसे मोजणे म्हणजे आपल्या जवान आणि निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या नापाक इराद्यांना साथ दिल्यासारखे आहे, अशा आशयाच्या शब्दात गावसकरांनी नाराजी व्यक्त केली होती. या वादग्रस्त मुद्याचा IPL मधील सनरायझर्स हैदराबादच्या संघालाही फटका बसू शकतो.