48,390.52 crores for IPL 2023-27 media rights : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधी झालेल्या ई लिलावात चार पॅकेजसाठी ४८, ३९०.५२ कोटींची विक्रमी बोली लागली. BCCI चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. रिलायन्सचे मालकी हक्क असलेल्या Viacom18 ने अनपेक्षित मुसंडी मारताना डिजिटल क्रांती घडवली. दरम्यान, या सर्वात ललित मोदींच्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“त्यांनी माझं नाव बॅन केलं आहे. कॉमेंट्रीदरम्यानही माझं नाव घेतलं जाऊ शकत नाही. त्यांनी हे बनवण्यासाठी काहीही केलं नाही, याची त्यांच्यात भीती आहे. मला काहीही फरक पडत नाही, हे संकुचित मानसिकता असलेले लोक आहेत. परंतु सत्य बदलता येणार नाही. आयपीएल मी बनवलं, माझ्यासाठी हेच खुप आहे,” असं ट्वीट ललित मोदी यांनी केलं. बीसीसीआयनं ललित मोदी यांचे आभार मानले पाहिजे, त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, अशा आशयाच्या एका ट्वीटला उत्तर देताना ललित मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज कोणकोणते?यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.
- पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
- पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
- पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात ८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
- पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी
एकूण मूल्य
Package A: २३,५७५ कोटी ( ५७.४० कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने ) - Star
Package B: २०,५०० कोटी ( ५७ कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने ) - Viacom
Package C: २,९९१ कोटी ( ३३.२४ कोटी प्रती सामना, एकूण ९८ सामने) - Viacom
Package D: १३२४ कोटी - Viacom & Times Internet