Join us  

KXIP vs SH, IPL 2018 : रात्रीस 'गेल' चाले; पंजाबचा हैदराबादवर विजय

गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 7:43 PM

Open in App
ठळक मुद्देआपल्या घरच्या मैदानात पंजाबचा हा हैदराबादविरुद्धचा पहिला विजय ठरला. त्याचबरोबर हैदराबादचा हा यंदाचा मोसमातील पहिला पराभव ठरला.

मोहाली : ख्रिस गेलने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. आपल्या घरच्या मैदानात पंजाबचा हा हैदराबादविरुद्धचा पहिला विजय ठरला. त्याचबरोबर हैदराबादचा हा यंदाचा मोसमातील पहिला पराभव ठरला.

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला चांगली सुरुवाच करता आली नाही. त्यांचा फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला. त्यानंतर धडाकेबाज युसूफ पठाणलाही फटकेबाजी करता आली नाही. पण कर्णधार केन विल्यम्सन (54) आणि मनीष पांडे (नाबाद 57) यांनी अर्धशतक झळकावले खरे, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

लिलावात गेलला कुणीही वाली ठरला नव्हता. त्यामुळे आयपीएलमधल्या आपल्या समावेशाबाबत त्याला साशंकता होता. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात स्थान दिले आणि या हंगामातील पहिले शतक झळकावत गेलने आपली निवड सार्थ ठरवली. गेलने आपल्या फटकेबाजीच्या तालावर हैदराबादच्या गोलंदाजांना भांगडा करायला लावला. गेलच्या दमदार शतकाच्या जोरावर पंजाबला हैदराबादपुढे 194 धावांचे आव्हान ठेवता आले. 

गेल आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असला तरी ठरवल्यावर आपण काहीही करू शकतो, हे गेलने गुरुवारी दाखवून दिले. गेलने यावेळी 20 षटके पूर्ण खेळली. गेलने 39 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा तो शतकाची वेस पार करेल, असे कुणाला वाटलेही नव्हते. पण त्यानंतरच्या 19 चेंडूंत त्याने आपले शतक फलकावर लावले. गेलने आपल्या शतकी खेळीत फक्त एक चौकार लगावला असला तरी तब्बल 11 षटकारांची आतिषबाजी केली. आपल्या शतकातील 66 धावा त्याने षटकारांच्या जोरावर लुटल्या. गेलने यावेळी 63 चेंडूंत नाबाद 104 धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

 

11.31 PM : पंजाबचा हैदराबादवर 15 धावांनी विजय

आपल्या घरच्या मैदानात पंजाबचा हा हैदराबादविरुद्धचा पहिला विजय ठरला. त्याचबरोबर हैदराबादचा हा यंदाचा मोसमातील पहिला पराभव ठरला.

11.23 PM :  हैदराबादच्या मनीष पांडेचे अर्धशतक

- मोहित शर्माच्या 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावत मनीष पांडेने आपले अर्धशतक पूर्ण केले.

11.12 PM : हैदराबादला चौथा धक्का; दीपक हुडा बाद

अॅण्ड्रयू टाय दीपक हुडाला बाद कर हैदराबादला चौथा धक्का दिला.

11.03 PM :  हैदराबाद 15 षटकांत 3 बाद 118

11.02 PM : हैदराबादला तिसरा धक्का; केन विल्यम्सन OUT

- अर्धशतक पूर्ण केल्यावर केन विल्यम्सनला जास्त फटकेबाजी करता आली नाही, त्याला अॅण्ड्रयू टायने बाद केले. विल्यम्सनने 41 चेंडूंत 54 धावा केल्या, यामध्ये 3 चौकार आणि दोन षटकाल लागावले.

10.59 PM : हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनचे अर्धशतक

- हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन यावेळी 39 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, यामध्ये प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांचा समावेश होता.

10.57 PM : हैदराबादचे शतक पूर्ण

10.40 PM : हैदराबाद 10 षटकांत 2 बाद 72

10.23PM : हैदराबादची दुसरी विकेट, मोहित शर्माने युसूफ पठाणला धाडले माघारी

 युसूफ पठाण 19 धावांवर बाद, हैदराबादला दुसरा धक्का 

10.07 PM : हैदराबादला पहिला धक्का, वृद्धिमान साहा बाद

- मोहित शर्माने हैदराबादला दिला पहिला धक्का, वृद्धिमान साहा बाद 

10.04 PM : दुखापतग्रस्त झाल्याने शिखर धवन मैदानाबाहेर 

- बरिंदर सरनचा चेंडू हाताला लागून शिखर धवनला दुखापत, रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडले 

 

मोहाली : लिलावात त्याला कुणीही वाली ठरला नव्हता. त्यामुळे आयपीएलमधल्या आपल्या समावेशाबाबत त्याला साशंकता होता. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात स्थान दिले आणि या हंगामातील पहिले शतक झळकावत ख्रिस गेलने आपली निवड सार्थ ठरवली. गेलने आपल्या फटकेबाजीच्या तालावर हैदराबादच्या गोलंदाजांना भांगडा करायला लावला. गेलच्या दमदार शतकाच्या जोरावर पंजाबला हैदराबादपुढे 194 धावांचे आव्हान ठेवता आले. 

गेल आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असला तरी ठरवल्यावर आपण काहीही करू शकतो, हे गेलने गुरुवारी दाखवून दिले. गेलने यावेळी 20 षटके पूर्ण खेळली. गेलने 39 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा तो शतकाची वेस पार करेल, असे कुणाला वाटलेही नव्हते. पण त्यानंतरच्या 19 चेंडूंत त्याने आपले शतक फलकावर लावले. गेलने आपल्या शतकी खेळीत फक्त एक चौकार लगावला असला तरी तब्बल 11 षटकारांची आतिषबाजी केली. आपल्या शतकातील 66 धावा त्याने षटकारांच्या जोरावर लुटल्या. गेलने यावेळी 63 चेंडूंत नाबाद 104 धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

9.37 PM : गेलचे दमदार शतक; पंजाबचे हैदराबादपुढे 194 धावांचे आव्हान

-   या हंगामातील पहिले शतक झळकावण्याचा मान पटकावला तो गेलने. गेलने 11 षटकारांच्या जोरावर नाबाद 104 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

9.30 PM : गेल शतकासमीप; फक्त एका धावेची गरज

- यंदाच्या हंगामातील पहिला शतकवीर होण्याचा मान ख्रिस गेलने पटकावले. गेलने 39 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतरच्या पन्नास धावा त्याने 19 चेंडूंत केल्या.

9.25 PM : पंजाबला चौथा धक्का; करुण नायर OUT

- हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी करुण नायरला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला.

9.10 PM : पंजाब 15 षटकांत 2 बाद 143

9.02 PM :  SIX, SIX, SIX, SIX... गेलचा षटकारांचा चौकार

- रशिद खानच्या चौदाव्या षटकात गेलने सलग चार षटकारांची आतिषबाजी केली.

8.57 PM : ख्रिस गेलचे अर्धशतक पूर्ण

- हैदराबादविरुद्धच्या लढतीत गेलने संयत फलंदाजी केली. त्यामुळेच त्याला आपले अर्धशतक पूर्ण करायला 39 चेंडू लागले.

8.55 PM : पंजाबचे शतक पूर्ण

- शकिब अल हसनच्या 12व्या षटकात दोन षटकार लगावत पंजाबच्या संघाने आपले शतक पूर्ण केले.

8.50 PM : पंजाबला दुसरा धक्का; मयांक अगरवाल बाद

- हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने पंजाबच्या मयांक अगरवालला बाद करत पंजाबला दुसरा धक्का दिला. मयांकने 9 चेंडूंत 18 धावा केल्या.

8.45 PM : पंजाब 10 षटकांत 1 बाद 82

8.37 PM : ख्रिस गेलचा चौथा षटकार

- दीपक हुडाच्या नवव्या षटकात गेलने चौथा षटकार लगावला.

8.34 PM : पंजाबला पहिला धक्का; लोकेश राहुल OUT

- रशिद खानच्या गोलंदाजीवर पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुल पायचीत झाला. राहुलने 21 चेंडूंत तान चौकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.

8.23 PM : पंजाब पाच षटकांत बिनबाद 38

- गेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने पाच षटकांत एकही फलंदाज न गमावता 38 धावा केल्या.

8.22 PM : SIX...SIX... SIX.... गेलचा तिसरा षटकार

- गेलने रशिद खानच्या पाचव्या षटकात आपला तिसरा षटकार लगावला. हा त्याचा वैयक्तिक तिसरा आणि या षटकातला दुसरा षटकार ठरला.

8.20 PM : ख्रिस गेलचा दुसरा षटकार

8.15 PM : SIX... गेलच्या तुफानी फलंदाजीला सुरुवात

- गेल सुरुवातीला सावधपणे फलंदाजी करत असला तरी ख्रिस जॉर्डनच्या चौथ्या षटकात षटकार लगवात त्याने फटकेबाजीला सुरुवात केली.

8.14 PM : हैदराबादचा भेदक मारा, पंजाब 3 षटकांत 13 धावा

8.09 PM : पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलचा दमदार चौकार

- भुवनेश्वर कुमारच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने चौकार वसूल केला.

8.07 PM : गेलचा झेल उडाला आणि काळजाचा ठोका चुकला

- पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलचा दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेल उडाला. तेव्हा चाहत्यांचा ठोका चुकला. पण हा झेल मात्र हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांना मात्र हा झेल टीपता आला नाही.

7.32 PM : पंजाबचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

 

 

घरच्या मैदानात पंजाबपुढे हैदराबादचे आव्हान

मोहाली : आपल्या घरच्या मैदानात गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सनरायझर्स हैदराबादच्या संघाशी दोन हात करणार आहे. पंजाबचा संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकल्यावर पंजाबला हैदराबादबरोबर सहा गुणांशी बरोबरी करण्याची संधी असेल. पण त्यांना अव्वल स्थान पटकावता येईल का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

दोन्ही संघ

 

 सराव करताना पंजाब आणि हैदराबादचे खेळाडू

टॅग्स :आयपीएल 2018किंग्ज इलेव्हन पंजाबसनरायझर्स हैदराबाद