Join us  

KXIP vs RR Latest News : जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलवर बेन स्टोक्सचा अफलातून झेल; KXIPला धक्का, Video

सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 7:46 PM

Open in App

सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. उभय संघांसाठी ही  लढत करा अथवा मरा अशा धर्तीची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघ कंबस कसून मैदानावर उतरले आहेत. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथचा हा निर्णय जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकात योग्य ठरवला. जोफ्रानं टाकलेल्या बाऊंसरनं KXIPचा ओपनर मनदीप सिंग याला चकवा दिला आणि बेन स्टोक्सनं अशक्य वाटणारा कॅच टिपून RRला पहिलं यश मिळवून दिलं. 

Rajasthan Royals Playing XI: रॉबीन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, रियान पराग, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरून आरोन, कार्तिक त्यागी- In: वरुण आरोन, Out: अंकित राजपूत

Kings XI Punjab Playing XI: लोकेश राहुल, मनदीप सिंग, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :IPL 2020बेन स्टोक्सराजस्थान रॉयल्सकिंग्स इलेव्हन पंजाब