इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथ्या स्थानासाठीची लढाई अधिक कट्टर होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) आव्हान संपुष्टात आले असले तरी अजून चार संघ शर्यतीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे सध्या आघाडीवर आहेत, परंतु आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) नं त्यांना सुरुवातीलाच तीन धक्के दिले. नाणेफेक जिंकून KXIPनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलनं पहिलंच षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिलं आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर नितिश राणाला ( ०) ख्रिस गेलकरवी बाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठी ( ७) आणि ३०० वा ट्वेंटी-20 सामना खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला ( ०) बाद केले. KKRचे तीन फलंदाज १० धावांवर माघारी परतले.
- मयांक अग्रवाल अनफिट, पंजाबच्या संघात बदल नाही; आंद्रे रसेल अनफिट, KKRचाही संघ कायम
किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल, मनदीप सिंग, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग
कोलकाता नाईट रायडर्स - शुबमन गिल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, सुनील नरीन, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी.
३०० ट्वेंटी-20 सामने खेळणारे भारतीय खेळाडू
रोहित शर्मा - ३३७
महेंद्रसिंग धोनी - ३२९
सुरेश रैना - ३१९
दिनेश कार्तिक - ३००*
विराट कोहली - २९२