Join us  

KXIP vs DD, IPL 2018 LIVE : दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवत पंजाब अव्वल

अखेरच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 7:52 PM

Open in App
ठळक मुद्देश्रेयसने 45 चेंडूंच पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 57 धावांची खेळी साकारली. 

रोमहर्षक लढतीत पंजाबचा दिल्लीवर चार धावांनी विजय

नवी दिल्ली : अखेरच्या चेंडूवर दिल्लीला विजयासाठी पाच धावांची गरज होती. श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता. मुजीब उर हुसेनने चेंडू टाकला, श्रेयसने तो भिरवकावला. षटकार जाणार की चौकार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती. पण चेंडू जाऊन विसावला तो आरोन फिंचच्या हातात, श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

गेलविना खेळणाऱ्या पंजाबला प्रथम फलंदाजी करताना 143 धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. दिल्लीने 42 धावांत तीन फलंदाजांना गमावले होते. पण त्यानंतर श्रेयसने दिल्लीचा डाव सावरला. श्रेयसने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. श्रेयसने 45 चेंडूंच पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 57 धावांची खेळी साकारली. 

11.35 PM : दिल्लीला विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची गरज

11.30 PM : दिल्लीला सातवा धक्का; लायम प्लंकेट बाद

- बरिंदर सरणने 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लायम प्लंकेटला बाद करत दिल्लीला सातवा धक्का दिला.

11.24 PM : दिल्लीला विजयासाठी 2 षटकांत २1 धावांची गरज

11.23 PM : दिल्लीला सहावा धक्का; टेवाटिया बाद

11.15 PM : दिल्लीला विजयासाठी ३ षटकांत २८ धावांची गरज

11.05 PM : दिल्ली १५ षटकांत ५ बाद ९६

10.52 PM : डॅनियल ख्रिस्टियन बाद; दिल्लीला पाचवा धक्का

- बाराव्या षटकात  डॅनियल ख्रिस्टियनने धावचीत होत आत्मघात केला.

10.43 PM : दिल्ली १० षटकांत ४ बाद ६५

10.35 PM : रीषभ पंत बाद; दिल्लीला चौथा धक्का

- मुजीब उर रेहमानने पंतला बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला.

- 10.25 PM :दिल्लीला हादरा; कर्णधार गौतम गंभीर बाद

- अॅण्ड्र्यू टायने सहाव्या षटकात कर्णधार गौतम गंभीरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

10.21 PM : दिल्ली पाच षटकांत २ बाद ४२

10.19 PM : ग्लेन मॅक्सवेल बाद; दिल्लीला दुसरा धक्का

10.10 PM : दिल्लीचा पहिला धक्का; पृथ्वी OUT

10.07 PM : पृथ्वी शॉ याची दमदार सुरुवात

- पृथ्वीने दिल्लीचा दमदार सुरुवात करुन दिली. दुसऱ्या षटकात पृथ्वीने तब्बल तीन चौकार वसूल केले.

गेलविना पंजाबच्या फलंदाजीची दैना; १४३ धावांपर्यंतच मजल

नवी दिल्ली : धडाकेबाज ख्रिस गेलविना खेळत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांची दैना सोमवारी आयपीएलच्या सामन्यात पाहायला मिळाली. दिल्लीच्या लायम प्लंकेट आणि अव्हेश खान यांनी भेदक मारा करत दिल्लीच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता न आल्याने १४३ धावांवर समाधान मानावे लागले. प्लंकेटने यावेळी भेदक मारा करत चार षटकांमध्ये फक्त १७ धावा देत तीन बळी मिळवले.

9.38 PM : पंजाबचे दिल्लीपुढे 144 धावांचे अव्हान

9.35 PM : आर. अश्विन  OUT; पंजाबला सातवा धक्का

- ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंजाबचा कर्णधार अशिवनला बाद केले.

9.26 PM : डेव्हिड मिलर OUT; पंजाबला सहावा धक्का

- डॅनियल ख्रिस्टीयनने डेव्हिड मिलरला प्लंकेटकरवी झेलबाद करत पंजाबला सहावा धक्का दिला. मिलरने 19 चेंडूंत प्रत्येकी एक चौकार आणि षटकार लगावत 26 धावा केल्या.

9.20 PM : करुण नायर OUT; पंजाबला पाचवा धक्का

- लायम प्लंकेटने सतराव्या षटकाच्या पहिल्यच चेंडूवर करुण नायरला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. करुणने 32 चेंडूंत 4 चौकाराच्या मदतीने 34 धावा केल्या.

9.09 PM :  पंजाब 15 षटकांत 4 बाद 100

8.59 PM : युवराज OUT; पंजाबला चौथा धक्का

- दिल्लीचा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने युवराजला यष्टीरक्षक रीषभ पंतकरवी झेलबाद केले. युवराजने 17 चेंडूंत 14 धावा केल्या.

8.49 :  पंजाब दहा षटकांत 3 बाद 68

8.36 PM : पंजाबला तिसरा धक्का; मयांक अगरवाल OUT

- लायम प्लंकेटने मयांक अगरवालला त्रिफळाचीत करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मयांकने 16 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.

8.29 PM : पंजाबचे सहाव्या षटकात अर्धशतक पूर्ण

8.24 PM : पंजाब पाच षटकांत 2 बाद 43

8.21 PM : पंजाबला हादरा; लोकेश राहुल OUT

- लायम प्लंकेटने पाचव्या षटकात लोकेश राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलने 10 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 19 धावा केल्या.

8.15 PM : लोकेश राहुलचा संघासाठी पहिला षटकार

- राहुलने अव्हेश खानच्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला, हा संघासाठीही पहिलाच षटकार होता.

8.10 PM : मयांक अगरवालचे सलग दोन चौकार

- मयांक अगरवालने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चौकार लगावत संघाला झोकात सुरुवात करून दिली.

8.06 PM : आरोन फिंच OUT; पंजाबला पहिला धक्का

- दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने पंजाबचा सलामीवीर आरोन फिंचला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. फिंचला यावेळी फक्त दोन धावा करता आल्या.

7.40 PM : ख्रिस गेल दिल्लीविरुद्धच्या लढतीला मुकणार

7.35 PM : पृथ्वी शॉ याला पदार्पणाची संधी

7.30 PM : दिल्लीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

अव्वल स्थान पटकावण्याचे पंजाबचे लक्ष्य

नवी  दिल्ली : विजयी घोडदौड करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धचा सोमवारचा सामना त्यांनी जिंकला तर पंजाबला अव्वल स्थानावनर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळे हा सामना जिंकून अव्वल स्थान पटकावण्याचे लक्ष्य पंजाबने आपल्या डोळ्यापुढे ठेवले आहे. दुसरीकडे ़दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. त्यामुळे या सा़मन्यात त्यांनी विजय मिळवला तर त्यांना पराभवाचा दुष्काळ संपवता येऊ शकतो. या सामन्यात पंजाबकडून धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल खेळणार ़नसून चाहत्यांना हा मोठा धक्का असेल.

 

दोन्ही संघ

 

 

 

टॅग्स :आयपीएल 2018किंग्ज इलेव्हन पंजाबदिल्ली डेअरडेव्हिल्स