दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) साठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) शतकी खेळीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) त्यांना मोठा पल्ला गाठू दिला नाही. प्रत्युत्तरात पंजाबचे तीन फलंदाज पहिला पॉवर प्लेत माघारी पाठल्यानंतर दिल्ली बाजी मारेल असेच वाटले होते. पण, निकोलस पूरन ( Nicholas Pooran) च्या फटकेबाजीनं त्यांना विजय मिळवू दिला नाही. ख्रिस गेल व ग्लेन मॅक्सवेल यांनीही छोटेखानी, परंतु वादळी खेळी करून दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. KXIP नं सलग तिसरा विजय मिळवून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी DCच्या डावाची सुरुवात केली, परंतु यावेळी ही जोडी फार मोठी भागीदारी करू शकली नाही. पृथ्वी शॉ ( ७) चौथ्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विकेट पडली असली तरी मागच्या सामन्यातील शतकवीर धवनची फटकेबाजी सुरूच होती. धवनने आयपीएलमधील ४०वे अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर ( ४६) ४०+ अर्धशतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे. रिषभ पंत आणि धवन यांची ३३ धावांची भागीदारी ग्लेन मॅक्सवेलनं तोडली. पंत १४ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिस ( ९) लगेच माघारी परतला. शिखर धवन ६१ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर नाबाद राहीला. दिल्लीनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. शिखर धवननं किंग्स इलेव्हन पंजाबला झोडपले; शतकासह IPL मध्ये मोठा पराक्रम केला
अश्विनच्या पुढच्या ( ७.५) षटकात पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला. पुरननं फटका मारल्यानंतर एक धाव घेण्यासाठी क्रीज सोडले, परंतु मॅक्सवेलनं त्याला माघारी पाठवले. रिषभ पंतला त्याला रनआऊट करण्याची संधी होती, पण लोकेश राहुलची कॉपी करण्याच्या नादात त्यानं ती गमावली. त्यानंतर निकोलसनं दमदार फटकेबाजी करताना २८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५३ धावा चोपल्या. त्यानं आणि ग्लेन मॅक्सवेलनं ६९ धावांची भागीदारी केली.