Kusal Mendis, Sri Lanka vs Bangladesh: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची वनेड मालिका नुकतीच पार पडली. यजमान श्रीलंकेच्या संघाने तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. संघाच्या विजयात श्रीलंकन बॅटर कुसल मेंडिस याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना ११४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुसल मेंडिसनं साधला मोठा डाव
बांगलादेश विरुद्धच्या शतकी खेळीच्या जोरावर त्याने सामनावीर पुरस्कारासह खास विक्रमाला गवसणी घातलीये. भारताचा स्टार बॅटर अन् रनमशिन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीसह, स्मिथ, रुट आणि बाबर आझम या चौघांना जे जमलं नाही ते त्यानं करून दाखवलंय. एक नजर त्याने वनडेतील शतकी खेळीसह आपल्या नावे केलेल्या खास रेकॉर्डवर...
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
२०२४ पासून वनडेत १००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला बॅटर
३० वर्षीय श्रीलंकन बॅटर मेंडिस हा २०२४ नंतर वनडेत १००० धावांचा पल्ला गाठणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याच्या खात्यात आता वनडेत ११४५ धावा जमा झाल्या आहेत. या यादीत कॅरेबियन बॅटर कीसी कार्टी दुसऱ्या स्थानावर असून त्याने ९९२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा चरित असलंका ९८४ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
कोहली मागे पडण्यामागचं कारण...
भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो वनडे सामनेच खेळताना दिसणार आहे. २०२४ मध्ये विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. या मालिकेत त्याने फक्त ५८ धावा केल्या होत्या. याशिवाय २०२५ मध्ये कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण ७ सामने खेळला होता. या वर्षात आतापर्यंत कोहलीनं २७५ धावा केल्या आहेत. २०२४ पासून कोहली फक्त १० वनडे सामने खेळताना दिसले. दुसरीकडे कुसल मेंडिस याने जवळपास २२ सामने खेळले आहेत. त्यामुळेच किंग कोहली मागे पडल्याचे दिसते.