Join us

कुलदीप यादवच्या फिरकीने घेतली साऱ्यांचीच गिरकी

या सामन्यात काही अशा अविस्मरणीय गोष्टी घडल्या की त्या काही जणांच्या गावीही नसतील. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने असा काही चेंडू टाकला की सारेच त्यामुळए चकित झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 16:56 IST

Open in App
ठळक मुद्देसॅम्युअल्स आणि मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय घडले ते कळत नव्हते.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये साऱ्यांना विराट कोहलीचा विक्रम आणि शाई होपने अखेरच्या चेंडूवर मारलेला चौकार या गोष्टीच आठवत असतील. पण या सामन्यात काही अशा अविस्मरणीय गोष्टी घडल्या की त्या काही जणांच्या गावीही नसतील. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने असा काही चेंडू टाकला की सारेच त्यामुळए चकित झाले.

कुलदीपने वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सने आपल्या गुगलीवर त्रिफळाचीत केले. त्याचा हा चेंडू स्टम्पवर येईल असे सॅम्युअल्सला वाटलेही नव्हते. पण हा चेंडू थेट स्टम्पवर लागला तेव्हा सारेच चकित झाले. सॅम्युअल्स आणि मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय घडले ते कळत नव्हते. अखेर जेव्हा रीप्ले पाहिला गेला, त्यावेळी सॅम्युअल्स त्रिफळाचीत झाल्याचे दिसून आले.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध वेस्ट इंडिज