'कुल' धोनीचा नवा अवतार, सोशल मीडियावर 'चर्चा तर होणारच'

महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. नुकतेच सीएसकेच्या खेळाडूंसह धोनीने मैदानात सरावालाही सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:32 PM2021-03-14T12:32:42+5:302021-03-14T12:33:48+5:30

whatsapp join usJoin us
'Kul' MS Dhoni's new incarnation, 'discussion will happen' on social media | 'कुल' धोनीचा नवा अवतार, सोशल मीडियावर 'चर्चा तर होणारच'

'कुल' धोनीचा नवा अवतार, सोशल मीडियावर 'चर्चा तर होणारच'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमहेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. नुकतेच सीएसकेच्या खेळाडूंसह धोनीने मैदानात सरावालाही सुरुवात केली आहे.

मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. सुरुवातीच्या काळात धोनीने वाढवलेल्या केसांमुळे त्याच्या लुकची चांगलची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे पाकिस्तान सैन्य दलाचे माजी प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही धोनीच्या लूकचं कौतुक केलं होतं. त्यानंतर, धोनीने केस कापल्यानंतरचाही त्याचा लूक चाहत्यांच्या पसंतीला उतरला. आता, पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. 

महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. नुकतेच सीएसकेच्या खेळाडूंसह धोनीने मैदानात सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आयपीएलची अधिकृत प्रसारण वाहिनी असलेल्या स्टार स्पोर्टने आपल्या ट्विटर हँडलवरुन धोनीचा हा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर, ट्विटर आणि फेसबुकवर माहीचा नवा अवतार सर्वांनाच आश्चर्याने अवाक करत आहे. 

या फोटोमध्ये धोनी बुद्ध भिक्षुकाच्या अवतारात दिसत असून डोक्यावरीस सगळे केस काढण्यात आले आहेत. धोनीचा हा फोटो कुठल्यातरी जाहिरातीसाठी काढण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण, या फोटोवर तसे लिहिल्याचे दिसून येते. मार्शल आर्ट्स ट्रेनिंग कॅम्पचा हा फोटो असल्याचं सांगण्यात आलंय. धोनीच्या या फोटोलाही सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत असून चाहत्यांना हा लूक आवडला आहे. या फोटोला शेअर करुन अनेकांनी आपल्या प्रतक्रिया दिल्या आहेत. 

Web Title: 'Kul' MS Dhoni's new incarnation, 'discussion will happen' on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.