Join us

रशीदच्या सांगण्यावरून कृणाल पांड्याचे भावालाच चॅलेंज!

क्रिकेटमध्ये फिरकीपटूने बाऊंसर टाकल्याची घटना फार क्वचितच घडली असेल. मात्र, कृणाल पांड्याने ते शक्य करून दाखवले. भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणा-या कृणालने इंग्लंड लायन्सविरूद्ध बाऊंसर टाकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:52 IST

Open in App
ठळक मुद्देजलदगती गोलंदाजांनीच ही मजा का घ्यावी? अशा गमतीशीर प्रश्नाची गुगली.

नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये फिरकीपटूने बाऊंसर टाकल्याची घटना फार क्वचितच घडली असेल. मात्र, कृणाल पांड्याने ते शक्य करून दाखवले. भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणा-या कृणालने इंग्लंड लायन्सविरूद्ध बाऊंसर टाकला आहे. डावखु-या फिरकीपटूकडून आलेल्या या अनपेक्षित चेंडूमुळे इंग्लड लायन्सचा फलंदाच चांगलाच गांगरला. त्याने कसाबसा तो चेंडू बॅटने अडवला. सामन्यानंतर कृणालने बाऊंसरचा तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आणि त्यावर जलदगती गोलंदाजांनीच ही मजा का घ्यावी? अशा गमतीशीर प्रश्नाची गुगली टाकली. कृणालच्या या ट्विटवर अफगाणिस्तानचा लेग स्पीनर रशीद खान याने त्वरित रिप्लाय केले आणि त्याने कृणालला असे चेंडू टाकण्यावर काम करण्याचा सल्ला दिला. कृणालने हा सल्ला स्वीकारला, परंतु त्याचा वापर एकमेकांविरूद्ध करणार नाही असा सल्लाही दिला. त्यावर रशीदने असा बाऊंसर भाऊ हार्दिकला टाकण्याचा सल्ला दिला. हार्दिकने लगेच हे चॅलेंज स्वीकारले. 

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेटक्रीडा