Join us

दबंग' पांडे; एका षटकात सहा Six, 19 चेंडूंत 83 धावा; 12 षटकार, 2 चौकार! Video

पुद्दुचेरी T10 लीग ( Pondicherry T10) मध्ये षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 20:01 IST

Open in App

पुद्दुचेरी T10 लीग ( Pondicherry T10) मध्ये षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. Patriots संघाकडून खेळणार्‍या कृष्णा पांडे ( Krishna Pandey)  याने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.

त्याचा हा झंझावात इथेच थांबला नाही, रॉयल्सने विजयासाठी ठेवलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना Patriots संघाची अवस्था 1 बाद 41 अशी झाली होती. तेव्हा 'दबंग' पांडे मैदानावर आला आणि षटकारांचा पाऊस पाडला. 

Patriotsने पहिल्या पाच षटकांत 1 बाद 41 धावा काढल्या. कृष्णाने सहाव्या षटकात सामन्याचे रुपच बदलले. नितेश ठाकूरच्या एका षटकात कृष्णाने सलग सहा षटकार खेचले. राईट हँड बॅट्समन कृष्णाने मैदानाच्या सर्व कोपऱ्यात चेंडू पाठवला. 19 चेंडूंत 83 धावांच्या खेळ त्याने बारा षटकार आणि दोन चौकार खेचले. त्याच्या खेळीमुळे संघाने दहा षटकांत दीडशे धावांचा पल्ला पार केला. 

436.80 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करूनही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अवघा चार धावांनी Patriotsने हा सामना गमावला. दरम्यान रॉयल्सकडून आर रघुपती ने 30 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :टी-10 लीग
Open in App