IPL 2024 : इंग्लंडसाठी ट्वेंटी-२०त वेगवान शतक झळकावणारा फलंदाज KKR च्या ताफ्यात

इंग्लंडच्या यष्टीरक्षक-फलंदाजाने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलग दोन शतकं झळकावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:42 AM2024-03-11T10:42:22+5:302024-03-11T10:42:39+5:30

whatsapp join usJoin us
Kolkata Knight Riders have named Phil Salt as a replacement for Jason Roy after the latter pulled out of the upcoming IPL 2024 owing to personal reasons | IPL 2024 : इंग्लंडसाठी ट्वेंटी-२०त वेगवान शतक झळकावणारा फलंदाज KKR च्या ताफ्यात

IPL 2024 : इंग्लंडसाठी ट्वेंटी-२०त वेगवान शतक झळकावणारा फलंदाज KKR च्या ताफ्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात तगड्या फलंदाजाला करारबद्ध केले आहे. जेसन रॉय याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आणि त्याच्याजागी KKR ने यष्टिरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट ( Phil Salt ) याला संघात घेतले आहे. आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा सॉल्ट ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता, परंतु आता त्याला १.५ कोटींच्या किमतीत KKR  ने आपल्या ताफ्यात घेतले. 


इंग्लंडच्या यष्टीरक्षक-फलंदाजाने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलग दोन शतकं झळकावली होती. चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात सॉल्टने ४८ चेंडूंत शतक पूर्ण केले, जे इंग्लंडकडून संयुक्तपणे सर्वात वेगवान शतक ठरले होते. फिल सॉल्ट हा जेसन रॉय सारखा आक्रमक सलामीवीर आहे, पण त्याचे यष्टिरक्षण कौशल्य KKRला अधिक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. त्यांच्याकडे दर्जेदार यष्टिरक्षकाची कमतरता होती आणि तो श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासाठी वरदान ठरू शकतो.


जेसन रॉयने आयपीएल २०२३ मध्ये केकेआरकडून खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि दोन अर्धशतकंही झळकावली. फिल सॉल्टने देखील आयपीएल २०२३ मध्ये DC कडून खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली होती. सॉल्टने २२८ ट्वेंटी-२० सामन्यांत २ शतकं व ३२ अर्धशतकांसह ५३०८ धावा केल्या आहेत. यष्टींमागे त्याने ११४ झेल घेतले आहेत, तर १३ स्टम्पिंग केल्या आहेत. 

IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू

  • मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
  • पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
  • डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
  • हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
  • अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
  • समीर रिझवी  ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी
  • रायली रूसो ( पंजाब किंग्स ) - ८ कोटी
  • शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी
  • रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
  • कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी
  • ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी

Web Title: Kolkata Knight Riders have named Phil Salt as a replacement for Jason Roy after the latter pulled out of the upcoming IPL 2024 owing to personal reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.