Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज

वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:06 IST

Open in App

हैदराबाद : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात चांगली नव्हती. ऑस्ट्रेलियात खेळत असताना सिराजने वडिलांना गमावले. तरीही या दौऱ्यात व पाठोपाठ इंग्लंडविरुद्ध त्याने दमदार कामगिरी केली. आयपीएलच्या सात सामन्यांत यंदा सहा बळी घेत आरसीबीचा तो मुख्य वेगवान गोलंदाज बनला. ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांत १३ गडी बाद करणाऱ्या सिराजने कर्णधार विराट कोहलीला फारच प्रभावित केले.

वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे.

विराट नेमका काय म्हणाला होता, हे सांगताना सिराजने सांगितले की, ‘तुझ्यात कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजाला बाद करण्याची क्षमता आहे. वडिलांच्या निधनामुळे मी हतबल झालो असताना, मला विराटने बळ दिले. हॉटेलच्या खोलीत मी रडत असताना विराटने माझ्याजवळ येत मला आलिंगन दिले. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, चिंता करू नकोस, असा धीर दिला. विराटच्या त्या शब्दांमुळे मला बळ मिळाले. माझे करिअर विराटमुळेच आहे.’

‘आयपीएलमधील सीएसके विरुद्धच्या सामन्यानंतर विराटने माझ्या गोलंदाजीचे कौतुक करीत, इंग्लंड दौऱ्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले होते. २० सदस्यांच्या संघात माझे नाव आहे. कर्णधाराच्या या शब्दांमुळे मला बळ मिळाले. शिवाय पुढे काहीतरी करू शकतो, याची प्रेरणा देखील लाभली,’ असे मत सिराजने व्यक्त केले. 

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीविराट कोहली